अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरुन एक माहिती दिली आहे. या माहितीमुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच झटका बसला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांची तब्ब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार प़डली आहे. त्यामुळे आता चाहत्यांविषयी चिंता करण्याची काहीच नाही. बिग बींना मोतीबिंदू झाला होता. त्याची शस्त्रक्रिया आज पार पडली.
‘झुंड’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली
रम्यान अमिताभ बच्चन हे सध्या झुंड या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी झुंड चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी त्यांनी हा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. झुंड हा चित्रपट येत्या 18 जूनला रिलीज होणार आहे.