Top Newsराजकारण

निवडणूक प्रचारात अमित शाहंना आठवला ‘सर्जिकल स्ट्राईक’ !

लखनऊ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकची आठवण काढली. शारदा युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मतदार संवाद कार्यक्रमात त्यांनी याची आठवण केली. पुलवामा, उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला हे मनमोहन सरकार नाही तर मोदी सरकार आहे याचा विसर पडला होता. या सरकारनं सर्जिकल स्ट्राईक करत बदला घेतला, असं अमित शाह म्हणाले.

पहिले काँग्रेस सरकार होतं आणि त्यांना सपा-बसपाचं समर्थनं होतं. यादरम्यान, पाकिस्तानातून शिरलेले दहशतवादी जवानांचा शिरच्छेद करत होते, परंतु सरकारला कोणताही फरक पडत नव्हता, असं शाह म्हणाले. यावेळी अमित शाह यांनी कलम ३७० चा उल्लेखही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याचं काम केलं. परंतु काँग्रेस सोबत सपा-बसपानं याचा विरोध केला. काश्मीरमध्ये दगड तर दूरच खडेही फेकण्याचं धाडस कोणी केली. भारत ही धर्मशाळा नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

भाजप सरकारकडून कोणावरही कायदेशीर कारवाई केली जाते तेव्हा अखिलेश यादव यांना का पोटदुखी होते. ज्या अखिलेश यादव यांनी आपल्या कार्यकाळात वीजही दिली नाही, ते आज मोफत वीज देण्याची घोषणा करत आहे. भाजपनं उत्तर प्रदेशात १.४१ कोटी गरीबांना मोफच वीज पुरवण्याचं काम केलं आहे. अखिलेश यादव यांना दोन एक्स्प्रेस वे बनवले आणि खुप फोटो काढले. ते मंदिर वहीं बनाएंगे असं म्हणत होते, परंतु तारीख सांगत नव्हते. परंतु आज मंदिर त्याच ठिकाणी बनत असल्याचंही शाह म्हणाले.

२०१९ मध्ये उत्तर प्रदेशच्या जनतेनं खूप प्रेम आणि पाठिंबा दिला. मी २०२२ मध्ये पुन्हा सांगायला आलोय. उत्तर प्रदेश बदलत आहे, तरुण पुढे जात आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न हळूहळू सुटत आहेत. उत्तर प्रदेशात बरंच काही करायचं बाकी आहे. सपा-बसपा युपीला खड्ड्यात टाकण्याचं काम करत होते. त्यांनी जातीवादाच्या आधारे सरकार चालवलं. एका पक्षाने एका जातीचं काम केलं, दुसऱ्या पक्षाने दुसऱ्या जातीचं काम केलं. जे लोक लोकशाही पद्धतीनं पक्ष चालवू शकत नाहीत, ते उत्तर प्रदेशचं सरकार काय चालवणार?, असा सवालही त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button