फोकस

अफगाणिस्तानात हवाई हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान दहशतवादी ठार

काबुल : वायू सेनेने केलेल्या हवाई हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तालिबानला रविवारी मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलं, जेव्हा वायू सेनेने शेबर्गन शहरात त्यांच्या एकत्र येण्याच्या ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

अफगाणिस्तान सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी फवाद अमान यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती देताना सांगितले, काल सायंकाळी वायु सेनेकडून त्यांच्या सभा व लपून बसण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर, शेबर्गन शहरात २०० पेक्षा अधिक तालिबान दहशतवादी मारले गेले. हवाई हल्ल्यामुळे मोठ्यासंख्येने त्यांचा शस्त्रसाठा व दारूगोळा तसेच त्यांची १०० पेक्षा अधिक वाहने नष्ट झाली. जावजान प्रांताच्या शेबर्गन शहरातील तालिबानच्या जमावाला आज सायंकाळी बी-52 बॉम्बरने निशाणा बनवलं गेलं. अशी माहिती देखील काल अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयातील अधिकाऱ्याने ट्विटद्वारे दिली होती.

तालिबानच्या जमावाला काल सायंकाळी साडेसहा वाजता शेबर्गन शहर, जोज्जान प्रांतात बी-५२ द्वारे लक्ष्य करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या वायुसेनेच्या हवाई हल्ल्यामुळे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असं अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयातील अधिकाऱ्याने ट्विट केलं आहे. या अगोदर एका पाकिस्तानी दहशतवाद्यास गझनी प्रांतीय केंद्राबाहेरील भागात अफगाणिस्तानच्या कमांडो दलाकडून अटक करण्यात आली होती. त्याचा दहशतवादी कारवाया आणि नागरिकांच्या हत्यांमध्ये सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button