फोकस

आर्यन खानच्या एनसीबी कोठडीत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढ

मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून त्याच्यासह इतर दोघांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. शाहरुखच्या लेकाने कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांची रात्र एनसीबी कोठडीत गेली. त्यानंतर त्यांना आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी अडीच तास दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींच्या कोठडीत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.

एनसीबीने आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. एनसीबीने शनिवारी रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आर्यन खानसह आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने आर्यनसह दोघांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, रविवारी रात्री दबंग खान सलमान रात्री 10 च्या आसपास शाहरुखच्या घरी पोहोचला. अर्धा तास त्याच्याशी चर्चा केल्यानंतर तो शाहरुखच्या घराबाहेर पडला. या भेटीत त्याने शाहरुखला धीर दिल्याची माहिती आहे.

एनसीबीकडून आर्यनला अटक करण्यात आल्याने शाहरुख खानने त्याचा स्पेन दौरा रद्द करण्यात आला आहे. शाहरुख त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी स्पेनला जाणार होता. पण त्याचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

कॉर्डेलिया क्रूजवर एनसीबीची पुन्हा छापेमारी; ८ जणांना अटक

ड्रग्ज जप्त केलेल्या कॉर्डेलिया क्रुज या आलिशान जहाजावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) कडून आज सकाळी छापा टाकून तपासणी करण्यात आली. आज सकाळी हे जहाज मुंबईला परतलं असताना एनसीबीने ही कारवाई केली. त्यावेळी आणखी ८ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. जहाजाच्या रूममधून अमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी रात्री उशिरा मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकला, जिथे पार्टीसाठी बरेच लोक उपस्थित होते, अंमली पदार्थांचे सेवन केले जात होते. यापैकी ८ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली, त्यापैकी तीन जणांना काल अटक करण्यात आली. एनसीबीने बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि दोन महिलांसह सात जणांना कॉर्डेलिया क्रूझ कंपनीच्या गोवा जाणाऱ्या जहाजावर छापे घातल्यानंतर अटक केली होती. शनिवारी संध्याकाळी, एनसीबीचे समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या टीमने जहाजावर पार्टी आयोजित करण्यात आल्याच्या माहितीच्या आधारे जहाजावर छापा टाकला होता. अधिकाऱ्यांनी १३ ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये जप्त केले आहेत. छाप्यादरम्यान, मुंबई एनसीबीचे २० हून अधिक अधिकारी ग्राहक म्हणून उभे असलेल्या जहाजावर चढले होते. जहाजावर १,८०० लोक होते. परंतु तपासणी केल्यानंतर आर्यन खानसह आठ जणांना वगळता एनसीबीने सर्वांना जाण्यास सांगितले गेले, असे अधिकाऱ्याने सांगितले. आर्यन खान व्यतिरिक्त अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, गोमित चोप्रा, नुपूर सारिका आणि विक्रांत चोकर अशी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button