देशात २४ तासांत ३ लाख ६८ हजार कोरोना रुग्णांची नोंद
नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात ३ लाख ६८ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ हजार ४१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३ लाख ७३२ रुग्ण उचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्या कमी दिसून आली आहे. रविवारी भारतात ३,९२,४८८ नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिसून आली होती.
राज्यात दिवसभरात ६२,९१९ नवीन रुग्ण
राज्यात मागील २४ तासात तब्बल ६२ हजार ९१९ रुग्णांचे निदान झाले. तर ५१,३५६ कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकूण ३९,८१,६५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.३१% एवढा झाला आहे.