आरोग्य

महिला सशक्तीकरणासाठी वॉकहार्ट हॉस्पिटलचा ‘मी निर्भय आहे’ उपक्रम आठवडाभर चालणार

मुंबई : वॉकहार्ट हॉस्पिटलने पुढाकार घेऊन “मी निर्भय आहे” हा आठवडाभर चालणारा उपक्रम आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना सुरु केला. महिला दिन आठवड्याची सुरुवात महिला कर्मचार्‍यांना आर्थिक ज्ञान देण्यासाठी फन विथ फायनान्स वेबिनार ने केली. आठवडाभराच्या या उत्सवात मजेदार आणि मनोरंजक उपक्रम असणार आहेत जसे, शारीरिक निरोगीपणा आणि पौष्टिक आहार कार्यशाळा त्यानंतर संध्याकाळी एक करमणूक आणि खेळाचे सत्र तसेच सेलिब्रेटी केक कटिंग सत्र ही होते.

वोकहार्ट हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय संचालिका जहाबिया खोराकीवाला म्हणाल्या, महिला मेहनती आणि जबाबदारीचे एक अद्वितीय संयोजन आहे. हे महत्त्वाचे आहे की आपण सर्वजण एकमेकांना उत्सव साजरा करण्यासाठी, प्रेरणा आणि पाठिंबा देण्यासाठी एकत्र आले पाहिजे. या महिला दिनाच्या दिवशी त्यांच्या आरोग्यासाठी आणि एकंदरीतच सर्वच चांगल्या गोष्टींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आम्हाला आनंद झाला आहे.

वोकहार्ट ग्रुपच्या मुंबई सेंट्रल, मीरा रोड, नागपूर, नाशिक आणि राजकोट रूग्णालयांमध्ये हा उपक्रम साजरा करण्यात आला ज्यामध्ये एकूण १२०० हून अधिक महिला कर्मचारी (नर्सिंग / ऍडमीन / हाऊसकीपिंग टीम आणि इतर विभागातील सहकारी वगैरे) समाविष्ट आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button