आरोग्य

दिल्लीत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा; गोल्डन हॉस्पिटलमध्ये २० रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनाचं संकट मोठं होताना दिसत आहे. कारण ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन मोठा तुटवडा पडतो आहे. दिल्लीच्या जयपूर गोल्ड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे २० रुग्णांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. दिल्लीतल्याच बत्रा आणि सर गंगा राम हॉस्पिटलमध्येही काही वेळ पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा असल्याचं वृत्त आहे.

जयपूर गोल्डन हॉस्पिटलचे एमडी डॉ. डी के बलूजा यांनी दावा केलाय, काल रात्री ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर असलेल्या २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीचच आणखी एक हॉस्पिटल सरोजमध्येही ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळेच नव्या रुग्णांना भरती करत नसल्याचं तसंच आहे. त्यांना डिस्चार्ज देत असल्याचं हॉस्पिटलनं म्हटलं आहे.

दिल्लीतल्या बत्रा हॉस्पिटलचे डॉक्टर ए एल गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार सकाळी ७ वाजता हॉस्पिटलमधलं ऑक्सिजन संपलं होतं. गुप्ता म्हणतात की, आम्हाला रोज ७ हजार लीटर ऑक्सिजनची गरज पडते आणि पाठवलं गेलं आहे फक्त ५०० लीटर, तेही काही वेळातच संपेल. स्थिती जशास तशी आहे. ३०० पेक्षा जास्त लोकांचा जीव टांगणीला आहे. यात ४८ जण आयसीयूत भरती आहेत. त्यांचं काय होणार हा मोठा सवाल आहे. लवकरात लवकर ऑक्सिजन पुरवणं गरजेचं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button