आरोग्य

आरोग्य विमा योजना अधिकाधिक महिला केंद्रीत असावी

रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि नेल्सन रिसर्च एजन्सीच्या अहवालातील निरीक्षण

मुंबई : रिलायन्स कॅपिटलची 100 टक्के सहाय्यक कंपनी असणाºया रिलायन्स जनरल इन्शुरन्सने नेल्सन रिसर्च एजन्सीच्या माध्यमातून एका सर्व्हेचे आयोजन केले होते. आरोग्य विमा गुंतवणुकीत महिलांचा सहभाग आणि त्यांची मानसिकता यांचा अभ्यास करण्यासाठी हा सर्व्हे घेण्यात आला होता. आर्थिक दूरदृष्टी आणि स्वातंत्र्याला प्रोत्साहन देऊन हजारो महिलांना आत्मनिर्भर करणे हे आरजीआयचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या अहवालानुसार 98 टक्के महिलांना असे वाटते की, आरोग्य विमा योजना अधिकाधिक महिला केंद्रीत बनवण्याची गरज आहे. त्यामध्ये मासिक पाळी, हार्मोनल समस्या, पीसीओडी उपचार, पोस्टपर्टम सिंड्रोंम संबंधीत मानसिक आजार, आॅस्टीओपोरोसीस उपचार आदींचा आरोग्य विमा योजनेत समावेश होणे आवश्यक आहे. घरी तसेच कामाच्या ठिकाणच्या तणावामुळे महिलांना अनेक आरोग्य विषयक समस्यांना सामारे जावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी आरोग्य विमा खूप महत्वाचा आहे महिलांचे शरीर हे पुरुषांच्या तुलनेत खूप वेगळे असल्यामुळे त्यांना संधीवात, स्तनांचा कर्करोग, स्वयं-रोगप्रतिकारक रोग, मासिक पाळी, हार्मोनल आजार यासारख्या अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. सवेर्तून निदर्शनास आले आहे की, विमा पॉलिसी खरेदी करीत असताना महिला विमा कव्हरेजची रक्कम, कॅशलेस उपचारांची सुविधा देणारी हॉस्पिटल्स आणि विमा कंपनीची दावा सेटलमेंट क्षमता यांचा प्रामुख्याने विचार करतात.

कोविड – 19 साथीच्या काळात गेल्या वर्षभरात या आजाराशी मुकाबला करीत असतानाच महिलांना आरोग्य विम्याचे महत्वही लक्षात आल्याचे आढळून आले आहे. या अहवालानुसार सुमारे 57 टक्के महिलांनी गेल्या वर्षभरातच आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केली आहे. त्या पॉलिसींपैकी तीन चतुर्थांश योजना किमान 15 लाख रुपयांचे कव्हरेज देणाºया आहेत. अहवालात पुढे म्हटले आहे की, आरोग्य विमा पॉलिसी अजूनही न घेतलेल्या 10 पैकी 7 महिला पुढील 6 महिन्यांत त्यासाठी गुंतवणूक करणार आहेत.

आर्थिक सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एकूण 61 टक्के महिला स्वत: निर्णय घेऊन आरोग्य विमा पॉलिसीचा निर्णय घेतात. आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेचा सर्वाधिक विचार करुन महिला याबाबत आपला अंतिम निर्णय घेतात. आरोग्य सेवांसाठी करावा लागत असणारा प्रचंड खर्च आणि आजारांची वाढती संख्या यांचा विचार करुन महिलांसाठी आरोग्य विमा योजना हा एक प्राधान्यक्रमाचा घटक बनत आहे.

जरी आरोग्य विम्याचा निर्णय घेण्याबाबत महिलांचा पुढाकार वाढत असला तरीही 10 पैकी सुमारे 7 महिला अशी पॉलिसी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यासाठी इतर कोणावर तरी अवलंबून असतात. अनेक महिलांच्या मते आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याचा निर्णय त्यांचा स्वत:च अंतिम करता यावा, यासाठी त्यांना त्याबाबत अधिक माहिती देणे गरजेचे आहे. अहवालामधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, महिला आरोग्य विमा योजनांच्या विविध प्लॅन्सची प्राथमिक माहिती आॅनलाईन पध्दतीने मिळवतात आणि पॉलिसी प्रत्यक्ष खरेदी करण्यावेळी मात्र विमा एजंट किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची मदत घेउनच आपला निर्णय प्रत्यक्षात उतरवतात. हे पॉलिसीची संपूर्ण माहिती नसल्यामुळे किंवा विशिष्ट विमा प्रोडक्टविषयी विश्वास वाटत नसल्यामुळे होत असते.
सर्व्हेसाठी आॅनलाईन पध्दतीने 547 महिलांची मते आजमावण्यात आली. या महिला टियर 1, 2 आणि 3 शहरांमध्ये राहणाºया तसेच 21 ते 45 या वयोगटातील होत्या. यापैकी 80 टक्के महिला या नोकरी-व्यवसायात कार्यरत असणाºया आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत्या.
अहवाल सांगतो की, अनेक वर्षांनंतर शेवटी महिलांचा आरोग्य विमा योजनांवरील विश्वास एक आर्थिक संरक्षित गुंतवणूक म्हणून वाढला आहे. याचा फायदा घेऊन विमा कंपन्यांनी नाविण्यपूर्ण आरोग्य विमा पॉलिसीज आणि अ‍ॅड आॅन आणून महिलांच्या गरजेनुसार आपले विमा प्रोडक्ट्स तयार केले पाहिजेत. त्यामुळे महिलांना आपल्या आरोग्याची काळजी तर घेता येईलच, शिवाय वैद्यकीय आणिबाणीच्या वेळी संपूर्ण आर्थिक संरक्षणाची हमीही मिळवता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button