इतर

नक्षलवाद्यांविरोधातील चकमकीनंतर छत्तीसगडमधील १८ जवान बेपत्ता

रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या चकमकीत 30 जवान जखमी झाले असून 18 जवान अद्याप बेपत्ता आहेत. या चकमकीत 5 जवान शहीद झाले असून यापैकी केवळ दोन शहिदांचा मृतदेह सापडला आहे.

अद्यापही 3 शहीद जवानांचे मृतदेह बिजापूर जंगलात असल्याची शक्यता आहे. सध्या 3 शहीद जवान मिळून 18 जवान बेपत्ता आहेत. बेपत्ता जवानांबाबत अद्याप कोणतीही माहिती मुख्यालयापर्यंत पोहोचली नसल्याचं सांगितलं जात आहे. सकाळी पुन्हा पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू होईल. ही चकमक कुख्यात कमांडर हिडमा याच्या टोळीसोबत झाला आहे. एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असता दुसरीकडे नक्षलवाद्यांकडून हल्ले सुरूच आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील बिजापुर येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 5 जवान शहीद झाले असून यामध्ये 2 छत्तीसगड पोलीस, 2 कोब्राचे जवान (CRPF) आणि 1 सीआरपीएफच्या बस्तरिया बटालियनचा जवान आहे.

छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्यात जवान शहीद झाल्याच्या वृत्तावर नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की, शहिदांचा त्याग कधीही विसरला जाणार नाही. जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button