अफगाणिस्तानात शाळेजवळ बॉम्बस्फोट; अनेक विद्यार्थ्यांसह २५ जणांचा मृत्यू
काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या पश्चिम भागात एका शाळेजवळ शनिवारी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये २५ लोकांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये अनेक तरुण विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती अफगान सरकारच्या प्रवक्त्याने दिली आहे.
रॉयटर्सच्या माहितीनुसार, मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक अरियान यांनी सांगितले की, या बॉम्बस्फोटमध्ये कमीत कमी ५२ लोकं जखमी झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पण बॉम्बस्फोट होण्यामागच्या कारणाबाबत काहीही सांगितले नाही. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ता गुलाम दस्तगीर नजारी यांनी सांगितले की, आतापर्यंत ४६ लोकांना रुग्णालयात घेऊन गेले आहेत. अमेरिकेने ११ सप्टेंबरपर्यंत सैन्य परत मागे घेण्याबाबत घोषणा केल्यापासून काबूल हाय अलर्टवर होता. आतापर्यंत या घटनेबाबत कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतली नाही आहे.
ज्या शाळेत स्फोट झाला, ती एक ज्वाइंट शाळा म्हणजे संयुक्त शाळा आहे. ज्यामध्ये मुलं आणि मुली दोन्ही शिकतात. येथे विद्यार्थी ती शिफ्टमध्ये शिक्षण घेतात. यामधील सेकंट शिफ्टमध्ये मुली शिकतात. त्यामुळे या घडलेल्या घटनेच्या मृतांमध्ये मुलीचा जास्त समावेश आहे, असे शिक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता नजीबा अरियान यांनी सांगितले आहे.