शिवजयंतीवरील निर्बंधांवरून देवेंद्र फडणवीस यांचा संताप
नागपूर – शिवजयंती सोहळ्यावर निर्बंध आणल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोगलाईशी तुलना केली आहे.
शिवजयंती व विज बिल संदर्भात राज्य सरकारने जी भूमिका घेतली त्यामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची तुलना मोगलाईशी केली. नागपूर येथे शिवजयंती उत्सवात सहभागी झाले तेव्हा बोलत होते. राज्यात राजकीय पक्षाचे मोठमोठे कार्यक्रम होतात त्यावर सरकार बंदी आणत नाही मात्र राज्य सरकारकडून शिवजयंती साजरी करतांना कलम १४४ लावले जाते. छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायला आम्हाला कोणी रोखू शकत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत शिवजयंती साजरी होत राहील, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकार विदर्भ व मराठवाड्याचा विकास निधी पळवत आहे.. विदर्भ वैधनानिक विकास मंडळ बंद करून यांनी निधी पळवण्याचा मार्ग मोकळा केला आहे.वैधनानिक विकास मंडळ बंद करून यांनी विदर्भ व मराठवाडा मधील जनतेचा विश्वासघात केला आहे, असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला आहे.
राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणात एक अहवाल न्यायालयात आहे त्यावर अजून निर्णय यायचा आहे… आता यावर बोलणे योग्य होणार न्यायालयाचा निर्णय आल्यावर भूमिका मांडू, असे त्यांनी सांगितले. वीज बिलावर काँग्रेस सत्तेत राहून विरोधी पक्षाची मजा घेण्याचा प्रयत्न करत आहे.. मंत्री काँग्रेसचा आहे मग ठाम भूमिका घ्यायला पाहिजे. जनता मूर्ख नाही त्यांना सर्व समजते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
ज्यांनी संविधान वाचले नाही, ज्यांनी महाराष्ट्र विधान सभेचे नियम वाचले नाही तेच अध्यक्ष निवडीवरून राज्यपालांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करू शकता. संविधानात सांगितले आहे अध्यक्ष निवडीची तारीख राज्यपालने ठरवून गुप्त मतदान पद्धतीने ती निवडणूक करावी त्यामुळे माझा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सवाल आहे की त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मान्य आहे की नाही. महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक टॅक्स कमी करत नाही, केंद्र सरकारने कृषिचा सेज पेट्रोल डिझेल वर लावून ३ रुपये टॅक्स कमी केला, तसे राज्य सरकार करत नाही त्यामुळे राज्यातील जनतेला अधिक पेट्रोल डिझेल साठी अधिक पैसे मोजावे असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.