राजकारण

महिलांवर अत्याचार, गुंडांची मिरवणूक आणि कॅबिनेट मंत्री ११ दिवसांपासून बेपत्ता!

भाजपकडून सरकारची कोंडी 

मुंबई – धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप ताजे असतानाच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची आयती संधीच भाजपला मिळाली आहे. त्यातच गुंड गजानन मारणेच्या मिरवणुकीने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची टीका भाजपने केली आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करून सरकारवर निशाणा साधला आहे. उपाध्ये यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात सर्वसामान्य सुरक्षित नाहीत हे तर दिसतच होतं, पण आता मंत्री महोदय १० दिवस गायब असतात कुणालाच सापडत नाही यापेक्षा राज्याची वाईट अवस्था काय असू शकते? रोज तुमच्या सोबत बसणारा सहकारी मंत्री ११ दिवस गायब आहे त्याला तरी शोधा, महिलांवर अत्याचार वाढलेत, गुंड मिरवणूक काढतो रस्त्यावर हे सगळ महाराष्ट्र पाहतोय पण थेट मंत्रीच ११ दिवस गायब. ना आता ना पता. जनतेला वाऱ्यावर सोडल हे दिसतय पण किमान सहकारी मंत्री त्याचा तरी शोध घ्या असा टोला उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे पथक यवतमाळ मेडिकलमध्ये येऊन गेले. ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी मेडिकलच्या प्रसूती वॉर्ड क्र. ३ मध्ये दाखल झालेली ती युवती नेमकी कोण, याचा उलगडा झालेला नाही. दाखल झालेल्या त्या युवतीचा पत्ताही नांदेड जिल्ह्यातील नोंदविण्यात आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात ६ फेब्रुवारीला पहाटे ४.३४ वाजता दाखल झालेल्या त्या २२ वर्षीय तरुणीचा गर्भपात करण्यात आला. शनिवारी दुपारी दोनपर्यंत तिच्यावर उपचार करून तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्जही केले. उपचारासाठी दाखल तरुणी नेमकी कुठली, हे स्पष्ट झाले नाही. ज्या युनिट-२ मध्ये ती दाखल झाली, त्या युनिटच्या डॉक्टरांनाही याबाबत काहीच माहिती नाही. पहाटे तिला दाखल करून उपचार करणारे डॉक्टर कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गर्भपात अर्धवट अवस्थेत झाल्यानंतर दाखल तरुणीला काही तासांतच रुग्णालयातून सुटी कशी देण्यात आली, हेही एक कोडे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button