मंत्री विश्वजीत कदम यांच्या कुटुंबियांची ‘ईडी’कडून चौकशी

पुणे : काही दिवसांपूर्वी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केली होती. त्या पाठोपाठ आता त्यांची मुलगी स्वप्नाली कदम यांची देखील सोमवारी ईडीकडून चौकशी सुरु झाली आहे. मंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली आणि चिरंजीव अमित कदम यांची विदेशी चलनासंदर्भात गेल्या दोन तासांपासून ईडीची चौकशी सुरु आहे. मात्र, चौकशीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चौकशी दरम्यान काय निष्पन्न होणार हे पहावे लागणार आहे.
मंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली आणि चिरंजीव अमित यांची परदेशात जमीन खरेदी प्रकरणी चौकशी सुरु आहे. परदेशात जमीन खरेदी आणि मालमत्ता खरेदी प्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले हे विश्वजीत कदम यांचे सासरे असून त्यांच्याही कार्यालयावर काही दिवसांपूर्वी ईडीने छापेमारी केली होती. फेमासंबंधीच्या प्रकरणात त्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरु होती. ABIL हाऊसमध्ये ही चौकशी सुरु होती. सहा वर्षांपूर्वीच्या विदेशी चलन प्रकरणी ही चौकशी सुरु असताना ईडीचे पथक थेट पुण्यात तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे कदम आणि भोसले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.