राजकारण

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोजी यांना भ्रष्टाचार प्रकरणात १ वर्षाचा तुरुंगवास

पॅरिस : फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोजी यांना पॅरिस न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणात 1 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. भ्रष्टाचार प्रकरणात निकोलस सरकोजी दोषी आढळले असून त्यांना 1 वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. सरकोजी 2007 ते 2012 दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात 10 दिवसांपर्यंत या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि पदाचा दुरुपयोग केल्याचाही आरोप आहे.

66 वर्षीय सरकोजी यांच्यावर संशय आहे की त्यांनी 2014 मध्ये एका वरिष्ठ न्यायाधीशाकडून महत्त्वाची माहिती विचारण्याचा प्रयत्न केला होता. फ्रान्सच्या इतिहासात पहिल्यांदा माजी राष्ट्राध्यक्षाविरोधात भ्रष्टाचाराच खटला सुरू आहे. सरकोजी यांच्याआधी जाक चिरक 2011 मध्ये सार्वजनिक पैशांचा दुरुपयोग केल्यात दोषी आढळले होते. पॅरिसच्या महापौरपदी असताना केलेल्या या दृष्कृत्यामुळे त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

सरकोजी यांची वैयक्तिक आयुष्यातील निर्णयामुळेही कायम चर्चेत राहिले आहेत. सरकोजी यांनी दोन लग्न केली होती. त्यांचं पहिलं लग्न मेरी डॉमनिक कुलियोली यांच्यासोबत झालं होतं. मात्र 1996 मध्ये दोघे वेगळे झाले होते. त्यांनतर त्यांनी सेसलिया सिग्नार या मॉडेलशी भेट झाली आणि 1988 मध्ये त्यांनी लग्नासाठी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला. 1996 मध्ये सरकोजी आणि सेसलिया यांचा विवाह पार पडला. त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी लुईस नावाच्या मुलाला जन्म दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button