Uncategorized

एसआरएतील घरे पाच वर्षांनी विकण्यास परवानगी देणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) मिळालेली घरे पाच वर्षांनंतर विकण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे असंख्य घर मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आधी ही अट दहा वर्षांसाठीची होती.
एसआरए योजनेंतर्गत मिळालेली घरे दहा वर्षांपर्यंत विकता येत नाहीत, पण तरीही वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांनी आर्थिक मोबदला घेत विक्रीचे व्यवहार केले आहेत. त्यावर एसआरएने अनेक मूळ मालकांना नोटीस पाठवली. त्यामध्ये घरे रिकामी करावी, असे आदेश दिले होते. परिणामी, हजारो घरमालक हवालदिल झाले होते. शिवसेना आणि भाजपने हा विषय उचलून धरला होता.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती पत्रपरिषदेत सांगितले की, एसआरएची घरे दहा वर्षे विकत येत नाहीत, पण ही कालमर्यादा पाच वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. दहा वर्षांच्या आत घरे विकणाऱ्यांना आम्ही नोटीस दिल्या आहेत, पण न्यायालयाचा अवमान होऊ नये म्हणून या नोटीस दिल्या आहेत. याबाबत येत्या २७ तारखेला राज्य सरकार न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. मात्र, यानंतर एसआरएमधील घरे पाच वर्षांनंतर विकता येतील, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button