Top Newsराजकारण

अनिल देशमुखांना ‘ईडी’चे वारंवार समन्स का ? वकिलांचा सवाल

मुंबई : आम्ही ईडीला संपूर्ण सहकार्य करत आहोत. आमच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. आज आम्ही अनिल देशमुख आणि ऋषीकेश देशमुख यांना ईडीने पाठवलेल्या समन्सला उत्तर दिले आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांचे वकील इंद्रजित सिंह यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने आमची याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे या याचिकेवर लवकरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतलेली असतानाच, ईडीकडून वारंवार अनिल देशमुख यांना का समन्स पाठवण्यात येत आहेत, हे कळत नाही, असेही ते म्हणाले. ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात असल्याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही असेही त्यांनी सांगितले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पाचव्यांदा ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले. त्यांनी ईडीच्या समन्सला वकीलांमार्फत उत्तर दिले आहे.

मनी लॉड्रिंग प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालय (ईडी) मार्फत हजर राहण्यासाठी पाचव्यांदा समन्स पाठवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख यांच्या याचिकेवरील निकालनंतर हा समन्स बजावण्यात आला होता. आज बुधवारी १८ ऑगस्टपर्यंत ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात अनिल देशमुख यांना हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आला होता. पण अनिल देशमुख यांनी चौकशीला हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले. देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग ईडी कार्यालयात हजर राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. ईडीच्या समन्सला वकील उत्तर देणार आहेत. अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स देऊन आज चौकशीला बोलावण्यात आले होते. पण पाचव्यांदा अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले.

अनिल देशमुख यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत समन्स बजावण्यात आला आहे. ईडीला अनिल देशमुखांवर असलेल्या पैशांच्या अपहाराच्या प्रकरणात जबाब नोंदवून घ्यायचा आहे. त्यासाठीच ईडीने पाचव्यांदा समन्स बजावला आहे. देशमुखांनी आतापर्यंत अनेकदा ईडीच्या समन्सला कोणताही प्रतिसाद न देता गैरहजेरी लावली आहे. ईडीमार्फतच्या कारवाईवर अनिल देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही अन्यायकारक अशी कारवाई असल्याचेही म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्यासोबतच त्यांची पत्नी आणि मुलगा ऋषिकेश यांनाही ईडीने समन्स बजावला आहे. पण हे दोघेही ईडीसमोर हजर राहिलेले नाहीत.

अनिल देशमुख यांनी जुलै महिन्यात व्हिडिओ स्टेटमेंट नोंदवतानाच सांगितले होते की, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत ईडीच्या तपासाला हजर राहण्यापासून पळवाट काढली होती. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच मी ईडीसमोर हजर होईन असे अनिल देशमुख यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button