Top Newsराजकारण

ड्रग्स पेडलर आणि भाजपचे कनेक्शन काय?; अमृता फडणवीसांचा फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा निशाणा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मुंबई क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेली कारवाई बनावट होती असा आरोप मंत्री नवाब मलिकांनी केला होता. या कारवाईतील तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मलिकांनी हल्लाबोल करत आरोपांची मालिकाच सुरु केली. वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवत नोकरी मिळवल्याचा दावा मलिकांनी केला.

समीर वानखेडे यांच्यासोबत आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता नवाब मलिकांनी थेट राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहे. नवाब मलिकांनी अमृता फडणवीस यांच्यासोबत एका व्यक्तीचा फोटो शेअर करत त्यावर आज भाजपा आणि ड्रग्स पेडलर यांच्या नात्यावर बोलू असं सांगत पत्रकार परिषदेपूर्वीच धुरळा उडवून दिला आहे. त्यानंतरच्या ट्विटमध्ये हा व्यक्ती जयदीप राणा असल्याचं मलिकांनी सांगितले आहे.

हे काय आम्हाला धमक्या देत आहेत, यांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. मी विधानसभेत जे प्रकरण आणणार आहे ते समोर आल्यानंतर भाजपचा नेता व कार्यकर्ता जनतेसमोर जाऊ शकणार नाही, असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. आज ज्यांच्यावर आरोप होते ते बाहेर आले आणि जे आरोप करत होते ते आरोपांच्या पिंजर्‍यात आहेत. एकंदरीत सिनेमाचा सिक्वेन्स बदलला आहे. त्याचा अंत तर होणारच आहे आणि जोपर्यंत हे प्रकरण धसास लावत नाही तोपर्यंत थांबणार नाही, असा इशारा मलिकांनी दिला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button