अर्थ-उद्योगतंत्रज्ञान

वेबसाईट्स.को.इनची ‘कॉर्नेल महा ६०’ मध्ये निवड

मुंबई : व्यावसायिक आणि उद्योजकांना आपल्या व्यवसायासाठी वेबसाईट अगदी पटकन तयार करता यावी यासाठी सक्षम करणारा, एक सहजसोपा वेबसाईट बिल्डिंग प्लॅटफॉर्म वेबसाईट्स.को.इनला (Websites.co.in) भारतातील पहिल्या आयव्ही लीग बिझनेस अ‍ॅक्सेलरेशन प्रोग्रॅममध्ये कॉर्नेल महा ६० मध्ये निवडण्यात आले आहे. अतिशय नाविन्यपूर्ण असे हे स्टार्टअप आता इतर ५९ स्टार्टअप्ससोबत महाराष्ट्राच्या भविष्यातील महान यशोगाथेचा एक भाग बनणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने न्यूयॉर्कच्या कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि क्सेड यांच्यासह आयोजित केलेला कॉर्नेल महा ६० हा संपूर्ण वर्षभर चालणारा उपक्रम असून, ६० प्रतिभावंत उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी यामध्ये एक इन्क्युबेशन सेंटर तयार करण्यात आले आहे.

वेबसाईट्स.को.इनचे सह-संस्थापक व सीईओ कार्तिक रायचुरा यांनी सांगितले, भविष्यातील लक्षणीय विकासाच्या नेतृत्वाची धुरा ज्यांच्या सक्षम हातांमध्ये असणार आहे अशा उद्यमींमध्ये माझा समावेश असणार आहे ही माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. या अ‍ॅक्सिलरेटर प्रोग्रामसाठी निवडण्यात आलेल्या मोजक्या भाग्यशाली व्यक्तींमध्ये मी आहे याचा मला खूप आनंद होत आहे.

व्यवसाय कौशल्यांचे, वृद्धीसाठी आवश्यक असलेला दृष्टिकोन विकसित करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी निवडण्यात आलेल्या अव्वल उद्योजकांमध्ये कार्तिक यांचा समावेश आहे. या सर्वांना उद्योगजगतातील तज्ञांसोबत संवाद साधण्यासाठी एक मंच देखील उपलब्ध करवून दिला जाईल. सहभागी होणाऱ्या स्टार्टअप्सना महाराष्ट्र सरकारच्या फंडरेजिंग यंत्रणेपर्यंत तसेच ग्राहकांपर्यंत पोहोच उपलब्ध होईल आणि त्याचेही अनेक लाभ त्यांना मिळतील.

वेबसाईट्स.को.इनचे सह-संस्थापक व सीटीओ धवल मेहता यांनी आपल्या सहकाऱ्याला मिळालेल्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले, कॉर्नेल महा ६० अ‍ॅक्सिलरेटर प्रोग्रॅममध्ये निवड झाल्यानंतर आमच्या प्लॅटफॉर्मला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. अजून जास्त मेहनत करून आणि नवनवीन गोष्टी आणून, अजून जास्त शिकून, आमचा ब्रँड अधिकाधिक विकसित करण्याचे आमचे उद्धिष्ट आहे.

वेबसाईट्स.को.इनची स्थापना २०१७ साली करण्यात आली. २०० दशलक्षपेक्षा जास्त सूक्ष्म उद्योजकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक व उपयुक्त वेबसाईट, ब्लॉग आणि इ-कॉमर्स स्टोर ५ मिनिटांहूनही कमी वेळात तयार करण्यासाठी सक्षम करणे हा या स्टार्टअपचा उद्देश आहे.

आजवर या प्लॅटफॉर्मने प्रचंड प्रभाव निर्माण केला असून त्यांचा युजर बेस १.५ मिलियनपेक्षा जास्त मोठा आहे. जगभरातील १८० पेक्षा जास्त देशांमध्ये ९८ भाषा बोलणारे त्यांचे युजर्स आहेत. ट्रॅक्शनने जगातील आघाडीच्या १० वेबसाईट बिल्डर स्टार्टअप्समध्ये निवडलेल्या वेबसाईट्स.को.इनला गूगल प्ले स्टोरने देखील गेल्या तिमाहीमध्ये ३९ देशांमध्ये टॉप अ‍ॅप म्हणून दर्शवले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button