अर्थ-उद्योग

सिग्निफायच्या पहिल्या टेलरमेड ३डी प्रिंटेड ल्युमिनेअर्सचे उद्घाटन

वडोदरा येथे ३डी प्रिटिंग सुविधा आणि नोएडा येथे डिझाइन लॅब उपलब्ध

नवी दिल्ली : सिग्निफाय (Signify) (युरोनेक्स्ट: लाइट), या प्रकाशाच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आज भारताच्या पहिल्या टेलरमेड ३-डी प्रिंटेड ल्युमिनेअर्सचे उद्घाटन केले. हे उत्पादनाचे अत्यंत लवचिक आणि अधिक शाश्वत स्वरूप असून त्यात १०० टक्के पुनर्वापरयोग्य पॉलीकार्बोनेटचा वापर केलेला आहे. त्यामुळे कंपनीला अत्यंत सुंदर डिझाइन केलेल्या किंवा ग्राहकांच्या गरजांनुरूप ल्युमिनेअर्सचे उत्पादन करणे आणि त्यांचे आयुष्यमान संपल्यावर त्याचे रिसायकलिंग करणे शक्य होईल. त्यामुळे चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

सध्या सिग्निफाय ही एकमेव मोठी प्रकाश उत्पादनांची उत्पादक कंपनी आहे, जी औद्योगिक आणि वाणिज्यिक पातळीवर भारतात ३डी प्रिंटेड प्रकाश उत्पादनांची निर्मिती करेल. भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उद्दिष्टांनुसार काम करताना या कंपनीने वडोदरा येथील आपल्या विद्यमान प्रकाश उत्पादन कारखान्यात ३डी प्रिंटिंग उत्पादन सुविधा स्थापित केली असून त्याचबरोबर नोएडा येथे आपल्या संशोधन आणि विकास केंद्रात डिझाइन लॅबही तयार केली आहे. तिथे इंटिरियर डिझायनर्स, वास्तुरचनाकार आणि लायटिंग डिझायनर्सना तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो आणि आपल्या नजरेसमोर आपले ल्युमिनेअर प्रिंट केलेले पाहता येते. ते सिग्निफायच्या डिझाइन तज्ञांसोबत काम करून त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणारे खऱ्या अर्थाने उत्तम डिझाइन तयार करू शकतात.

सिग्निफायची ३डी प्रिंटिंगमधील गुंतवणूक कंपनीची आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्याची वचनबद्धता दर्शवते. त्याचबरोबर त्यांचा आणि स्वतःचा कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि पुन्हा प्रिंट करण्यायोग्य, पुनर्वापरायोग्य, पुन्हा तयार करणे आणि रिसायकलिंग करणे अशा प्रकारची उत्पादने तयार करताना जबाबदार वापर आणि उत्पादन (एसडीजी१२) यांच्यावर भर दिला जातो. हा सिग्निफायच्या २०२५ मध्ये आपला वर्तुळाकार महसूल ३२ टक्क्यांनी दुप्पट करण्याच्या वचनबद्धतेतील महत्त्वाचा घटक आहे. तो सप्टेंबर २०२० मध्ये त्यांच्या सुरू केलेल्या (launched in September 2020) ब्राइटर लाइव्ह्ज, बेटर वर्ल्ड २०२५ (Brighter Lives, Better World 2025) उपक्रमाचा भाग आहे. ३डी प्रिंटिंग हे एक ट्रिपल बॉटम लाइन तंत्रज्ञान आहे- ते वातावरण, ग्राहक आणि कंपन्यांसाठी उत्तम आहे.

ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर ऑनलाइन आपले ३डी प्रिंटेड ल्युमिनेअर्स डिझाइन करून ऑर्डर करू शकतात किंवा आपली ऑर्डर देण्यासाठी जवळच्या फिलिप्स स्मार्ट लाइट हबला भेट देऊ शकतात. ३डी प्रिंटिंगमधून आलेली साधने व पोत अगणित आहेत आणि आपल्या कल्पनाच त्याला मर्यादित करू शकतात. ग्राहक आपल्या खऱ्या खास आणि आगळ्यावेगळ्या डिझाइनसाठी आपला रंग, फिनिश आणि पोत निवडू शकतात. व्यावसायिक ग्राहक आपले ल्युमिनेअर येथे डिझाइन करू शकतात आणि https://www.tailored.lighting.philips.com/en/in/ आणि आपली ऑर्डर देण्यासाठी विक्री टीमसोबत संपर्क साधू शकतात.

एक ३डी प्रिंटेड ल्युमिनेअर आपल्या ग्रहासाठीही उत्तम आहे, कारण त्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑप्टिक्स वगळता पारंपरिकरित्या उत्पादित धातूच्या ल्युमिनेअरच्या तुलनेत ४७ टक्के कमी कार्बन ऊत्सर्जन आहे. अंतिम उत्पादनाचे वजनही पारंपरिक ल्युमिनेअरच्या तुलनेत दोन-तृतीयांश आहे. म्हणजेच एकूण ३५ टक्के कमी कार्बन उत्सर्जन शिपिंगदरम्यान होईल. या ल्युमिनेअर्सचा जवळपास प्रत्येक घटक त्याचे आयुष्य संपल्यावर पुनर्वापर किंवा रिसायकल केला जाऊ शकतो आणि त्यातून नवीन डिझाइन्स तयार केल्या जाऊ शकतात. त्यामुळे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेला चालना मिळू शकते.

ल्युमिनेअर्सच्या ३डी प्रिंटिंगचा वापर केल्याने कंपन्यांना आपली शाश्वतता ध्येये साध्य करणे शक्य होते आणि कस्टमायझेशनच्या अमर्याद पर्यायांसोबत आपल्या प्रकाश उत्पादनांची सहनिर्मिती करणेही शक्य होते. तसेच, ग्राहक आपली ल्युमिनेअर्स रिसायकलिंगसाठी परत पाठवून आणि नवीन डिझाइन्समध्ये पुन्हा प्रिंट करण्यासाठी आपल्या प्रकाश उत्पादनांची डिझाइन नव्याने बनवू शकतात. त्यामुळे त्यांना काळासोबत सुसंगत राहता येते. ही ल्युमिनेअर्स मागणीवर प्रिंट केली जातात आणि ग्राहकांच्या विशिष्ट गरजांनुरूप असल्यामुळे कोणत्याही अ‍ॅडजस्टमेंटसाठी किंवा इन्स्टॉलेशनदरम्यान सीलिंगमधील बदलासाठी कोणताही अतिरिक्त खर्च येत नाही.

या अनावरणाबाबत बोलताना, सुमित जोशी, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सिग्निफाय इनोव्हेशन्स इंडिया लिमिटेड म्हणाले की, “आम्हाला केंद्र सरकारच्या स्वयंपूर्ण भारताच्या उद्दिष्टावर आधारित राहून औद्योगिक पातळीवर भारतात ३डी प्रिंटेड ल्युमिनेअर्स आणणारी पहिली प्रकाश उत्पादन कंपनी ठरताना खूप अभिमान वाटतो. त्यातून प्रकाश उत्पादने आणि शाश्वत नावीन्यपूर्णतेतील आमचे स्थानही पुनर्स्थापित होते. ल्युमिनेअर्सच्या प्रिंटिंगमुळे उत्पादनाचा अधिक लवचिक, वेगवान आणि पर्यावरणस्नेही मार्ग मिळतो. कारण आम्ही नवीन डिझाइन तयार करू शकतो किंवा विद्यमान डिझाइन्स कस्टमाइज करू शकतो, जेणेकरून त्या ग्राहकांच्या गरजा मोठ्या गुंतवणुकीशिवाय आणि दीर्घ विकास चक्रांशिवाय पूर्ण करू शकतात. ग्राहक काही महिन्यांपेक्षा काही दिवसांत आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवू शकतात आणि प्रिंटिंगला कमी ऊर्जेची गरज लागते.

सिग्निफायने जगाच्या इतर भागांमध्येही ३डी प्रिंटिंग सुविधा आणल्या आहेत. त्यात अमेरिका, बेल्जियम, नेदरलँड्स आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे. या कंपनीने मार्क्स अँड स्पेन्सर्स (एमअँडएस), अल्बर्ट हेजन, एसएएस, टोटल आणि प्रॅक्सिस यांच्यासारखे ग्राहक या उत्पादनांसाठी निश्चित केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button