अर्थ-उद्योग

मित्सुबिशी महिंद्रा अ‍ॅग्रिकल्चरल मशिनरी कं. लि. व कुबोटा कंपनी लि. यांचे व्यावसायिक सहकार्य

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची (“एम अँड एम”) जपानी उपकंपनी मित्सुबिशी महिंद्रा अ‍ॅग्रिकल्चरल मशिनरी कं., लि., जपान आणि कुबोटा कं., लि., जपान या दोन्ही कंपन्यांनी व्यावसायिक सहकार्याची व्यवस्था निर्माण केली असल्याचे उभय कंपन्यांकडून घोषित करण्यात आले.

महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि मित्सुबिशी महिंद्रा अ‍ॅग्रिकल्चरल मशिनरी कं., लि.चे अध्यक्ष राजेश जेजुरीकर यांनी सांगितले, “जपानी बाजारपेठेसाठी केलेल्या व्यावसायिक सहकार्याच्या घोषणेमुळे आम्ही फार खूष आहोत. यामध्ये मोठ्या प्रमाणात सहयोगात्मक प्रयत्नांचा समावेश असेल, तसेच परस्परांकडील ओईएम पुरवठा व्यवस्थेचा विस्तार, आयओटीचा संयुक्त उपयोग व इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सोल्यूशन्स आणि जपानी बाजारपेठेसाठी उत्पादन विकासाकरीता सहयोगाच्या संधींचा शोध घेणे, या बाबीही यात समाविष्ट असतील.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button