लस संपल्याने अनेक राज्यात लसीकरण बंद
नवी दिल्ली : लसीकरण वाढल्याने देशातील महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ पाठोपाठ आता ओडिशात देखील लसींचा साठा संपुष्टात आला आहे. ओडिशात ९०० लसीकरण केंद्रांना कुलूप लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेले लसीकरण मोहत्सव फेल झाल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस देशात लाखोंच्या संख्येने कोरोबाधित आढळून येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. देशात १६ जानेवारी रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात लसीकरणाला अपेक्षित एवढा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, त्यानंतर अनेकांनी लसीला उत्तम प्रतिसाद दिला. दरम्यान, ओडिशामधील परिस्थिती देखील बिकट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिल दरम्यान देशात लसीकरण महोत्सवाची घोषणा केली. त्यानुसार ओडिशात पहिल्या दिवशी ८१ हजार १६९ लोकांनी ५९३ कोरोना लसीकरण केंद्रावर लस घेतली. मात्र, त्यानंतर तब्बल ९०० लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारवर आरोप-प्रत्यारोपही करण्यात येत आहेत. लसीकरण महोत्सवाची घोषणा झाल्यानंतर पहिल्या दिवशी १ लाख १३ हजार ५६६ लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. मात्र, जसजशी कोरोना लसीकरणाची जनजागृती करण्यात आली त्यानंतर लोकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे केवळ ८१ हजार १६९ लोकांना लसीकरण करण्यात आले आणि त्यानंतर लसीकरण केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे एका अधिकाऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे ‘पुढील दोन दिवस लसीकरण होईल की नाही’, हे काही सांगता येत नाही.
पश्चिम बंगालमधील लसीकरण केंद्र बंद
पश्चिम बंगालमधील परिस्थिती देखील काही वेगळी नाही आहे. पश्चिम बंगालमधील लसीकरण केंद्रही बंद पडली आहेत. त्यामुळे आता लसीकरण महोत्सवात लसीकरण कसे करावे, असा प्रश्न पडला आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये आज चार लाख वॅक्सिन येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.