आरोग्य

ऑक्सिजन न मिळाल्यामुळे १ तासात तब्बल ७ रुग्णांचा मृत्यू

नालासोपाऱ्यात विनायक हॉस्पिटलमधील प्रकार

पालघर : पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तब्बल सात रुग्णांचा तासाभरात मृत्यू झाला आहे. नालासोपाऱ्यातील विनायक हॉस्पिटलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी या घटनेप्रकरणी संताप व्यक्त करत रुग्णालयात गोंधळ घातला.

नालासोपाऱ्यात सोमवारी तब्बल १० रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला. यापैकी ७ रुग्ण हे विनायक तर ३ रुग्ण हे रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये मृत्यूमुखी पडले. या दोन्ही हॉस्पिटलमध्ये सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ऑक्सिजनचा साठा संपला होता. परिणामी एक तासात तब्बल १० रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाने हे सर्व रुग्ण अत्यवस्थ होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा दावा केला आहे. याप्रकरणी आता चौकशी होऊन कारवाई होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच राज्य सरकारने या अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीने महत्त्वपूर्ण पावलं उचलणं जास्त जरुरीचं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button