मानवी हक्काचं सर्वाधिक उल्लंघन उत्तर प्रदेशात; गृह मंत्रालयाची संसदेत माहिती
नवी दिल्ली : मानवी हक्क उल्लंघनाची ताजी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दिली आहे. त्यात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशात देशात सर्वात जास्त मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही अनेकदा सवाल उपस्थित केले जातात.
योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर काही कठोर निर्णय घेण्यात आले, मात्र तरीही मानवी हक्कांचं उल्लंघन जास्त होत आहे. देशातील एकूण तक्ररीपैकी ४० टक्के तक्रारी या उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षातील आकडेवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी जाहीर केली आहे. त्यात ही बाब समोर आली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांकडून विद्यार्थी, पत्रकार, मनवी हक्कांचं संरक्षण करणाऱ्या अटक करून तुरूंगात टाकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावेळी आरोपांची पडताळणी न करता ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तुरुंगातील गर्दी कमी करण्याचे न्यायालयाचे निर्देश असतानाही, सरकारविरोधत बोलणाऱ्या अनेकांना तुरुंगात डांबण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहे. तसेच बहुसंख्य लोकंना नजरकैदेत ठेवल्याचाही आरोप आहे. सीएए कायद्याविरोधात आंदोलन केलेल्या आंदोलकांना अटक केल्याच्या घटनाही उत्तर प्रदेशात जास्त घडल्या आहेत. तसेच या अहवालात आणखी एक बाब समोर आली आहे ती म्हणजे, सहमतीने आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना अटक केल्याच्या घटनाही उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. त्यामुळे हा अहवाल उत्तर प्रदेशसह देशाची चिंता वाढवणारा आहे.