शिक्षण

१२ वी परीक्षेसंदर्भात राज्य सरकारांनी २ दिवसांत अहवाल पाठविण्याचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

नवी दिल्ली : देशातील वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने सर्व बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांसदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय स्तरावर बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्व राज्यातील शिक्षणमंत्री, शिक्षण विभागाचे सचिव, मुख्यमंत्री, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक उपस्थित होते. १२ वीच्या परीक्षा घेण्यावर सरकार ठाम असून त्या कशाप्रकारे घेण्यात याव्यात यावर विविध राज्यांतील शिक्षणमंत्र्यांकडून माहिती घेण्यात आली.

देशात कोरोना परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान सध्या कोरोना परिस्थिती कायम असूनही आणि कोरोनाची तिसरी लाट घातल ठरणार असल्यामुळे सर्वच राज्यांनी शाळा सुरु न करण्यावर भर दिला आहे. तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १ महिन्यानंतर परीक्षा घ्यावी अशी विनंती केली आहे.

दरम्यान १२ वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा कशा प्रकारे घेण्यात येणार याबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे १ जूनला माहिती देण्याची शक्यता आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सर्व राज्यातील शिक्षणमंत्र्यांना आपला निर्णय लिखित स्वरुपात येत्या २ दिवसांत म्हणजेच २५ मेपर्यंत देण्यास सांगितले आहे. यानंतर १२ वीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button