Top Newsस्पोर्ट्स

महाराष्ट्राचे एकीकरण करणारा वकील

- अ‍ॅड. राजू वाघ, मालेगाव

– अ‍ॅड. राजू वाघ

वकिलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे सातत्याने उत्तमरित्या आयोजन करणाºया अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे यांना खरे तर महाराष्ट्रातील वकिलांचे एकीकरण करणारा वकील असेच म्हणावे लागेल. स्व. रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशन आणि नाशिक डिस्ट्रिक्ट अ‍ॅडव्होकेट्स क्रिकेट अ‍ॅण्ड स्पोर्टस असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्रालाच नाही तर कर्नाटकच्या वकील संघांना नाशिक येथे क्रिकेट खेळण्याची संधी जगदाळेंच्या माध्यमातून मिळाली आहे. मी २००० पासून त्यांच्यासोबत आहे. स्वत:चे कौशल्य वापरून सर्वांना एकत्रित ठेवण्याचे काम ते करतात. स्पर्धेबाबत महाराष्ट्रातील सुमारे २ ते ३ हजार वकील खेळांडूसोबत चर्चा झडतात. प्रत्येकाच्या मताचा विचार होईल यावर ते भर देतात. जवळपास २० वर्षांच्या आमच्या मैत्रीपूर्ण नात्यात त्यांना जवळून अनुभवता आले. वकील मंडळींवर असणारा कामाचा, व्यावसायिक स्पर्धेचा ताण लक्षात घेत वकिलांची तंदुरुस्ती, सुसंवाद वाढावा, राज्यभरतील वकिलांची या निमित्ताने ओळख व्हावी असा सर्वंकष विचार करून जगदाळेंनी सुरू केलेल्या या क्रिकेट स्पर्धा प्रत्येकासाठी आवश्यक बनल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी झालेल्या वकिलांमध्ये वर्षानुवर्षाचे मैत्रीचे नातेसंबंध तयार झाले आहेत. तशी जगदाळे यांच्यासोबतच माझी अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे, तीही क्रिकेटच्या माध्यमातूनच. अगदी पहिल्या भेटीतच या माणसाने क्रिकेटच्या माध्यमातून कळत न कळत माझ्यासह अनेक वकील बांधवांना कधी आपलेसे केले कळलेच नाही. वकिलांवर प्रेम करणारा, सगळ्यांच्या भावनांना हात घालणारा, सगळ्यांच्या सुख-दु:खात सामील होणारा, क्रिकेटवर निरागसपणे प्रेम करणारा, जणू क्रिकेटसाठीच आपला जन्म झाला असावा असा अवलिया म्हणजेच अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे! गेल्या चाळीस वर्षांपासून क्रिकेट खेळत आलो, पण क्रिकेट क्षेत्रात असा माणूस शोधूनही सापडणार नाही. क्रिकेट हा फक्त खेळ नसून समाजकार्य करण्याचे देखील माध्यम असू शकते हे जगदाळे यांच्याकडे बघून लक्षात येते.

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात जाऊन क्रिकेट खेळण्याचा प्रसंग आला. काही ठिकाणे सोडली तर मला असे जाणवले की त्या जिल्ह्यातील वकील मित्रांना क्रिकेटच्या माध्यमातून जगदाळे यांनी स्पर्धा घेण्यासाठी पुढाकार घेत पाहिजे ती मदत करण्याची तयारी दाखविलेली आहे. हा त्यांचा मनाचा मोठेपणा. परंतु केलेल्या कार्याची जगदाळे यांनी कधीच कुठे वाच्यता केली नाही किंवा त्याचा लाभ घेण्याचा कधी त्यांनी प्रयत्न केल्याचे आठवत नाही.

सुरवातीच्या काळात रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी वकिलांच्या क्रिकेटसोबतच अनेक उदयोन्मुख नवतरुण बालकांना कृष्णा अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून विनामोबदला क्रिकेटचे धडे दिले. सोबतच वकील बांधवांच्या अनेक स्पर्धा संपन्न केल्यात. काही वर्षांनी जगदाळे यांनी नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट अँड स्पोर्ट्स असोसिएशन या ट्रस्टची स्थापना केली. त्या ट्रस्टमध्ये सहसेक्रेटरी असण्याचा मला त्यांनी बहुमान दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये नाशिकमध्ये घेतलेल्या टुर्नामेंटस् असोत वा यंदा नाशिकमध्ये आयोजित केलेला ‘एमएपीएल’चे चौथे पर्व हे तसे जिकिरीचे काम होते. या स्पर्धेकरिता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींसह मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना निमंत्रित करून जगदाळे यांनी क्रिकेटच्या माध्यमातून वकिली क्षेत्राला चार चांद लावलेत असेच म्हणावे लागेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button