नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्या, पण उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यांचं मन इतकं मोठं नाही. त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्यात, या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज स्पष्ट केले.
राणे यांनी आज मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का असं विचारण्यात आल्यानंतर राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘संजय राऊत यांना काही ना काहीतरी बोलायचंच असतं. चांगलं नाही वाईटच बोलायचं असतं. संजय राऊत यांना सांगेन खातं बरं वाईट नसतं, तर काम कसं करतो हे महत्वाचं असतं. या खात्याला मी जेव्हा न्याय देईन तेव्हा संजय राऊतच हे खातं चांगलं आणि मोठं होतं असं म्हणतील, असा टोलाही राणे यांनी लगावला.
मंत्रिमंडल में जगह देने के लिए मैं प्रधानमंत्री का शुक्रिया अदा करता हूं। मैं सोचूंगा कि देश की जीडीपी कैसे बढ़े और देश के युवाओं को कैसे रोजगार मिले। महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने मुझे मंत्री बनने पर बधाई नहीं दी है। उनका दिल इतना बड़ा नहीं है: नारायण राणे https://t.co/iKq4EfmF0V pic.twitter.com/E208eHgppw
— ANI_HindiNews (@AHindinews) July 8, 2021
नरेंद्र मोदींनी नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिलं आहे. नारायण राणे यांची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळली आहेत, असं संजय राऊत सकाळी म्हणाले होते.
राणे यांनी आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. देशाचा जीडीपी कसा वाढेल तसंच देशातील तरुणांना रोजगार प्राप्त होण्यासाठी काय करता येईल याचा मी विचार करेन, असं राणे यांनी म्हटलंय.