राजकारण
अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; सीबीआयला तपास करण्याचे कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली : दिल्लीतील विशेष न्यायालयाने काल केंद्रीय अन्वेषण ब्युरोला कागदपत्र लीक प्रकरणाच्या संदर्भात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
सीबीआयने गाडीचे इंजिन सोडून दिले, फक्त गाडीतून प्रवास करणाऱ्यांना अटक केली आहे. कारण इंजिन किंवा घोडा ओढल्याशिवाय गाडीची स्वारी नसते. असे म्हणत सीबीआयला अनिल देशमुख यांच्या भूमिकेची अधिक चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने सीबीआयला चार आठवड्यांत स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयात सीबीआय अधिकारी तिवारी व अनिल देशमुख यांचे वकील अनिल डागा यांच्याविरुध्द कागदपत्रे लीक केल्याबद्दल दाखल दोषारोपाची दखल घेताना हे आदेश दिले.




