केरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार; सुप्रिया सुळेंकडून अभिनंदन
मुंबई : केरळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले आहेत. ए. के. शशींद्रन आणि थॉमस के. थॉमस अशी त्यांची नावे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोघांचे अभिनंदन करत भावी संसदीय कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच केरळच्या विजयासाठी तेथील नेते पी. सी. चाको यांचे अभिनंदन करून, त्यांच्या खडतर कष्टाबद्दल आभार मानले आहेत.
दरम्यान, सुळे यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबईतील राजभवनात जाऊन सदिच्छा भेट घेतली. याबाबत सुप्रिया सुळे यांनी स्वत ट्वीट करुन माहिती दिली असून, त्यास राजभवन कार्यालयानेही दुजोरा दिला आहे.
‘बंगालच्या मतदारांनी ममता बॅनर्जी यांना भरभरून पाठिंबा दिला आहे आणि संबंध देशाच्या सत्तेला पराभूत केले आहे. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे चाललेय, याला रडीचा डाव एवढंच म्हणता येईल,’ असे ट्वीट राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले असून, ते ट्वीट खा. सुप्रिया सुळे यांनी रिट्विट केले आहे.