तंत्रज्ञानराजकारण

ट्विटरचा रविशंकर प्रसाद यांना झटका; अकाऊंट तासभर लॉक, नंतर अनलॉक !

नवी दिल्ली : केंद्रीय कायदा आणि न्याय, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट कापीराईट कायद्याचे अल्लंघनासंदर्भात ब्लॉक करण्यात आलं होतं. एका तासानंतर अकाऊंट सुरु झाल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. रविशंकर प्रसाद यांनी याबाब अकाऊंट लॉक असताना आणि अनलॉक करण्यात आल्यानंतरचे स्क्रीन शॉट शेअर करत ट्विटरवर आरोप केले आहेत.

रविशंकर प्रसाद यांनी ट्विट करत आज अत्यंत विचित्र काहीतरी घडले. अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या आरोपानुसार ट्विटरने जवळजवळ एका तासासाठी लॉगीन करण्यापासून मज्जाव केला. त्यानंतर जवळपास एका तासानंतर त्यांनी खातं अनलॉक केल्यानंतर लॉगीन करता आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

ट्विटरची ही कृती माहिती तंत्रज्ञान कायदा २०२१ च्या नियम ४(८) चं उल्लंघन करते. ट्विटरनं माझ्या खात्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यासंबंधीची नोटीस द्यायला हवी होती त्यांनी से केलं नाही, असं रविशंकर प्रसाद म्हणाले. ट्विटरवर करण्यात येणाऱ्या कारवाईसंदर्भातील वक्तव्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ट्विटरसंबंधात विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतींच्या क्लिपचा परिणाम समोर आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही टेलिव्हिजन चॅनेल आणि कोणत्याही अँकरनं कॉपीराईट नियमांचं उल्लंघण झाल्याती तक्रार केली नाही.

ट्विटरनं केलेली कृती ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या बाजून नसल्याचं समोर आलं आहे. त्यांना त्यांचा अजेंडा राबवायचा असल्याचं दिसून आलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कोणत्याही प्रकारे नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार लागू करण्यात आलेले नियम मान्य करावे लागतील, त्या बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button