राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई – राज्य सरकारकडून सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रवीण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश आहे. प्रवीण परदेशी यांना अतिरिक्त मुख्य सचिव, मराठी भाषा विभाग, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे. तर आयटी विभागाचे संचालक असलेले रणजीत कुमार यांची मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे व्ही. पी. फड यांची मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सचिव सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भिवंडी-निजामपूर महापालिकेचे डॉ. पंकज अशिया यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राहुल गुप्ता यांना उस्मानाबादच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. येथे नियुक्त केले आहे. मनुज जिंदल यांची जालना जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मिताली सेठी यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.