Top Newsफोकसराजकारण

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डला आग; ११ जणांचा मृत्यू

अहमदनगर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ५० ते ८५ वयोगटातील आहेत.

आयसीयू कक्षामध्ये कोरोनाची लागण झालेल्या २५ जणांवर उपचार सुरू होते. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यामध्ये सात जण सात जण अत्यंत गंभीर असून राहिलेल्या २० जणांना तातडीने इतर कक्षांमध्ये हलवण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन देण्याची कार्यवाही तातडीने सुरू झाली.

हिवरे बाजारचे सरपंच तथा पद्मश्री पोपटराव पवार हे उद्या दिल्लीला जाणार असल्याने कोरोना टेस्ट करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. ते बाहेर उभे असतानाच कक्षाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोकरणा हेही त्यांच्या दालनामध्ये होते. पोपटराव पवार यांना ही आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी सर्व यंत्रणांना तातडीने फोन केले. पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, महापालिकेचे आयुक्त यांच्यासह सर्व यंत्रणांना तातडीने फोन केले. त्यामुळे अग्निशमन दल, जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महापालिकेची यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी धाव धाव घेतली आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. आयसीयू रुग्ण भाजलेल्या अवस्थेत असताना त्यांना तातडीने इतर कक्षात हलवण्यात आलं आणि तातडीने त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली मात्र त्यातील काही रुग्ण अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नातेवाईकांचा हंबरडा

दरम्यान गंभीर रुग्णांना बघून त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला सुरुवात केली दरम्यान घटनास्थळी तातडीने आमदार संग्राम जगताप हे दाखल झाले. त्यांनी सर्व परिस्थितीची पाहणी केली.

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीमुळे सरकारी रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयालातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत सुरुवातीला १० जणांचा मृत्यू झाला होता. तर १ रुग्ण गंभीर जखमी झाला होता. मात्र, उपचारादरम्यान त्या रुग्णाचाही मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता ११ वर पोहोचली. दरम्यान मृतांच्या नावाची यादी आता समोर आली आहेत. मृतांमध्ये सहा पुरूष तर चार महिलांचा समावेश आहे. १) रामकिशन विठ्ठल हरपुडे, २) सिताराम दगडू जाधव, ३) सत्यभामा शिवाजी घोडेचोरे, ४) कडूबाई गंगाधर खाटीक, ५) शिवाजी सदाशिव पवार, ६) कोंडाबाई मधुकर कदम, ७) आसराबाई गोविंद नागरे, ८) शबाबी अहमद सय्यद, ९) दिपक विश्वनाथ जडगुळे अशी या मृतांची नोवे आहेत. ११ मृतांपैकी अद्याप दोन जणांची ओळख पटू शकलेली नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले चौकशीचे आदेश

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

अहमदनगरमध्ये झालेल्या आगीच्या घटनेनं महाराष्ट्र हदरुन गेला. या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, तर आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखाच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना पुढे म्हणाले की, नाशिक येथे झालेल्या गॅस गळतीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. मात्र तरीही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

मोदींकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगरमधील दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केलीय. महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांकडे शोकभावना व्यक्त करतो. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ दे, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.

आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा : चित्रा वाघ

आगीच्या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. फायर ॲाडिट केले आहे का? असा सवाल करत यावर श्वेतपत्रिका जारी करा, असे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी आरोग्य मंत्र्यांच्या कामाचेच ॲाडिट करून हकालपट्टी करा, अशा शब्दांत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, भंडारा, विरार, कोल्हापूरच्या घटनेनंतरही सरकारला जाग आली नाही. आज नगरच्या सिव्हिल हॅास्पिटलच्या आगीत रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. फायर ॲाडिट केलंय का? यावर श्वेतपत्रिका जारी करा. राज्यात रूग्णालये मृत्यूचे सापळे बनताहेत. आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा.

या घटनेचा जाब विचारूच, सरकारला सोडणार नाही; चंद्रकांत पाटलांचा इशारा

नगरची घटना दुर्दैवी आहे. विरोधी पक्षाचा नेता म्हणून कोणीतरी ही घटना घडवली असे मी म्हणणार नाही. बरं होण्यासाठी आलेल्या ११ रुग्णांचे दिवाळीत बळी गेले आहेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा विषय लावून धरणार आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच भाजप हा विषय सोडणार नाही, नेमकं काय झालं, कोणामुळे झालं हे आम्ही विचारु, असा इशारा देत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहीजे अशी मागणी केली. आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत. रुग्णालयात काही शिस्त लावण्याची गरज असेल तिथं मदतीला तयार आहोत, असे आश्वासनदेखील चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button