राजकारण

मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या तब्बल ६५ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

मुंबई : पोलिसांच्या बदल्यांसाठी राज्यात मोठे रॅकेट सुरु असल्याचा अहवाल दाबल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. संपूर्ण राज्यातून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेत तब्बल 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजेच मुंबईतील सर्व युनीट प्रमुखांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सीआययू युनिटचे एपीआय रियजुद्दीन काझी यांना सशस्त्र पोलीस दलात पाठवण्यात आलंय. तर सीआययू युनिटचे एपीआय प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी मुकेश अंबानी धमकी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत.

मागील काही दिवसांपासून सरकारवर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू, सचिन वाझे खंडणी, मुकेश अंबानी धमकी आणि आता पोलिसांच्या बदल्यांसाठी रॅकेट अशा अनेक प्रकारचे संकटं राज्य सरकारसमोर उभे टाकले आहे. विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका होत आहे. 15 वर्षांपासून निलंबित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेतलं जातं. याच पोलिसावर खंडणीचे आरोप होतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस दलावरील विश्वास उडाल्याचं म्हटलंय. तसेच, पोलीस दल तसेच राज्य सरकारने चिंतन करण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलात हे मोठे बदल करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button