अर्थ-उद्योग

ट्रेडस्मार्टच्या ट्रेडिंग व्हॉल्युममध्ये नोंदवली ५० टक्के वाढ

मुंबई : भारतातील आघाडीच्या नवीन युगातील डिस्काउंट ब्रोकरेज कंपन्यांपैकी एक ट्रेडस्मार्टने एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात महाराष्ट्रातील सरासरी ट्रेड व्हॉल्युम ५० टक्के वाढल्याची घोषणा केली. या काळात महाराष्ट्रातील अनन्यसाधारण (युनिक) ट्रेडर्समध्ये ३१ टक्के वाढ झाल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

ट्रेडस्मार्टच्या ग्राहकवर्गामध्ये जास्तीत-जास्त संख्या ३१-४० वयोगटातील ग्राहकांची आहे, यावर कंपनी भर देत आहे. प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांमध्ये पुरुषांचे प्रमाण ८५ टक्के, तर स्त्रियांचे १५ टक्के आहे. मात्र, ट्रेडर्सच्या संख्येत झालेल्या वाढीमध्ये ५० टक्के प्रमाण १८-२५ वयोगटातील ट्रेडर्सचे आहे. एनएसई इक्विटी इन्व्हेस्टमेंट्समध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्के वाढ झाली आहे. याच कालखंडात एनएसई ट्रेडिंगने सर्वोच्च बिंदू गाठलेला कंपनीने पाहिला. यामध्ये सर्वाधिक संख्या फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये (एफअँडओ) झालेल्या ट्रेड्सची होती, तर इक्विटी ट्रेड्समध्ये, गेल्या वर्षातील याच कालखंडाच्या तुलनेत, ४ टक्के वाढ झाली आहे. वर्तमान आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत महिन्यागणिक लक्षणीय वाढ होत राहील, असे कंपनीला अपेक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button