अर्थ-उद्योग

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजची ‘चांदी’ !

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सर्वच उद्योगांमध्ये चांगली वाढ झाल्याने निव्वळ नफा हा ४६ टक्क्यांवरून वाढून ४९.२ टक्क्यांवर गेला आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मोठा नफा कमावला आहे. मुकेश अंबानी जिथे हात घालतील तिथे सोने काढतील, अशा प्रकारचा अनुभव दुसऱ्या तिमाहीतील निकालाने दाखवून दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स रिटेलचे उत्पन्न दुसऱ्या तिमाहीत १८ टक्के वाढले आहे. हे उत्पन्न ३८,५६४ कोटी रुपयांवरून ४५,४५० कोटींवर जाऊन पोहोचले आहे. रिलायन्स रिटेलच्या वार्षिक उत्पन्नाचा विचार केला तर ही वाढ ११ टक्के आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज हा नफा १५,४७९ कोटी रुपयांनी वाढला आहे. फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजचा महसूल ६८.८ टक्क्यांनी वाढला आहे. तो १,०८,७५० कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा निव्वळ नफा हा ९२२८ कोटी रुपये झाला आहे. रिलायन्स रिटेलसोबतच रिलायन्सच्या अन्य सहउद्योगातही मोठा फायदा झाल्याचे दिसून येते. फॅशन लाईफस्टाईल बिझनेसमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्रॉसरी बिझनेसमध्ये मोठी वाढ झाली आहे.

जियो प्लॅटफॉर्मचा रेव्हेन्यू हा १५.२ टक्क्यांनी वाढून २३,२२२ कोटी रुपये झाला आहे. तर नफा हा ३,७२८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा नफा २३.५ टक्के जास्त आहे. रिलायन्सला मीडिया उद्योगातून ३०.७ टक्के महसूल वाढ मिळाली आहे. EBITDA देखील ५२.४ टक्के वाढून २५३ कोटी रुपये झाले आहे. ऑईल अँड गॅस क्षेत्रात वार्षिक ३६३ टक्केच्या जबरदस्त वाढीसह १,६४४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. सोबत १,०७१ कोटी रुपयांचा EBITDA देखील नोंदविण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button