मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त सातारा जिल्ह्याला भेट देऊन पाहणी करणार होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरातून माघारी फिरलं आहे. सातारा आणि कोयनानगर परिसरात जोरदार पाऊस आणि खराब हवामान यामुळे कोयनानगरातील हेलिपॅडवर लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे हे हेलिकॉप्टर पुणे विमानतळाकडे माघारी फिरलं. वातावरण खराब असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यावरुन सकाळी ११ च्या सुमारास कोयनानगरकडे रवाना झालं. ११.३० वाजता ते कोयनानगर हेलिपॅडवर पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र कोयनानगर परिसरात जोरदार पाऊस आहे. त्यामुळे हे हेलिकॉप्टर लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर पुण्यात परतलं.
मुख्यमंत्री साताऱ्यातील कोयनानगर येथील पूरग्रस्तांच्या निवारा छावणीला ते भेट देण्याचं नियोजन होते. पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधणार होते.