Addressing the Golden Jubilee celebrations of Symbiosis University. https://t.co/FHOLRKkrU9
— Narendra Modi (@narendramodi) March 6, 2022
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केले.त्यांनी सिम्बॉयसिस आरोग्य धामचेही उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते.
याप्रसंगी सिम्बॉयसिसचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना,‘या संस्थेच्या वसुधैव कुटुंबकम’ या ब्रीदवाक्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितले की, विविध देशांतील विद्यार्थ्यांच्या रूपाने ही आधुनिक संस्था भारताच्या प्राचीन परंपरेचे प्रतिनिधित्व करत आहे. “ज्ञानाचा प्रसार दूरवर आणि व्यापक झाला पाहिजे, संपूर्ण जगाला एक कुटुंब म्हणून जोडण्यासाठी ज्ञान हे माध्यम बनले पाहिजे, ही आपली संस्कृती आहे.मला आनंद आहे की, ही परंपरा आपल्या देशात अजूनही जिवंत आहे”, असे ते म्हणाले.
नव्या भारताचा आत्मविश्वास अधोरेखित करत पंतप्रधानांनी नमूद केले की, भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट अप व्यवस्था भारतात आहे. “स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांसारखी अभियाने तुमच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करत आहेत. आजचा भारत नवोन्मेषी, सुधारणावादी आणि संपूर्ण जगाला प्रभावित करणारा आहे”, असे पंतप्रधानांनी सांगितले. कोरोना लसीकरणाच्या संदर्भात भारताने आपली लक्षणीय कामगिरी जगाला कशाप्रकारे दाखवून दिली हे पुणेकरांना चांगलेच माहीत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
त्यांनी भारताच्या प्रभावाकडे लक्ष वेधले आणि ऑपरेशन गंगा मोहिमेद्वारे युद्धग्रस्त युक्रेनमधून भारत आपल्या नागरिकांची सुखरूप सुटका करत असल्याचे सांगितले. “जगातील मोठ्या देशांना असे करणे कठीण जात आहे. पण भारताच्या वाढत्या प्रभावामुळेच आम्ही हजारो विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले आहे,” असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी देशातले बदलती परिस्थिती अधोरेखित केली. ते म्हणाले, “तुमची पिढी भाग्यवान आहे. तुमच्या पिढीला पूर्वीच्या बचावात्मक आणि अवलंबून राहण्याच्या मानसिकतेचा दुष्परिणाम सहन करावा लागला नाही. देशात हे परिवर्तन घडवण्याचे जर पहिले श्रेय कोणाचे असेल तर ते तुम्हा सर्वांचे आहे, आपल्या युवा पिढीचे आहे.
पूर्वी आवाक्याबाहेर समजल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये भारत जागतिक नेता म्हणून उदयास आला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. सात वर्षांपूर्वी भारतात फक्त 2 मोबाईल उत्पादक कंपन्या होत्या. आज 200 हून अधिक उत्पादन युनिटस या कामात गुंतलेली आहेत, असे ते म्हणाले. संरक्षण क्षेत्रातही जगातील सर्वात मोठा आयातदार देश म्हणून ओळखला जाणारा भारत आता संरक्षण निर्यातदार होत आहे. आज, दोन मोठ्या संरक्षण संधी प्राप्त होत आहेत, ज्याद्वारे देशाच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वात मोठी आधुनिक शस्त्रे तयार केली जातील, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रे खुली झाल्याचा पुरेपूर लाभ उठवण्याचे आवाहन केले. जिओ-स्पेशियल अर्थात भू-अवकाशीय प्रणाली, ड्रोन, सेमी-कंडक्टर आणि अंतराळ तंत्रज्ञान या क्षेत्रात अलिकडच्या काळात झालेल्या सुधारणांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले,“देशातील सरकारचा आज देशातील तरुणांच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी एकामागून एक क्षेत्रे खुली करत आहोत.”
“तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, तुम्ही तुमच्या करिअरसाठी ज्याप्रकारे ध्येय ठरवता , त्याचप्रमाणे देशासाठी तुमची काही उद्दिष्टे असली पाहिजेत,” असे मोदी म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक समस्यांवर उपाय शोधण्याचे आवाहन केले. त्यांना विद्यार्थ्यांना तंदुरुस्त तसेच आनंदी आणि उत्साही रहायला सांगितले. “जेव्हा आपली उद्दिष्टे वैयक्तिक विकासाकडून राष्ट्रीय विकासाकडे वळतात , तेव्हा राष्ट्र उभारणीत सहभागी झाल्याची भावना उफाळून येते,” असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी विद्यार्थ्याना दरवर्षी एक संकल्पना निवडून काम करण्याचे आवाहन केले आणि संकल्पना निवडताना राष्ट्रीय आणि जागतिक गरजा डोळ्यांसमोर ठेवून निवड करायला सांगितले. याचे निष्कर्ष आणि कल्पना पंतप्रधान कार्यालयाबरोबर सामायिक करता येतील असे पंतप्रधान म्हणाले.
मोदी आठवलेंच्या खांद्यावर हात ठेवून हसले, गप्पाही रंगल्या
पंतप्रधानांनी पुणे दौऱ्यात विविध विकास कामांचं लोकार्पण केलं. पुण्यातील पहिल्या मेट्रो रेल्वेला हिरवा कंदिल दाखवला. मुळा-मुठा नदीच्या सुशोभिकरणाच्या प्रकल्पाचंही भूमीपूजन केलं. त्यानंतर त्यांनी सभेला संबोधित केलं. यावेळी मंचावर सत्ताधारी आणि विरोधकही उपस्थित होते. स्टेजवर मोदींच्या एका बाजूला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बसले होते. मोदींनी स्टेजवर उभं राहून हात जोडून पुणेकरांना अभिवादन केलं. त्यानंतर ते आसनाकडे वळले. यावेळी त्यांनी आठवलेंच्या खांद्यावर हात ठेवून त्यांची विचारपूसही केली. ही विचारपूस सुरू असतानाच दोन्ही नेते हास्यविनोदातही रमले. मोदी आणि आठवले यांचा गप्पागोष्टी आणि हास्य विनोदात रमतानाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
On landing in Pune, PM @narendramodi unveiled a statue of Chhatrapati Shivaji Maharaj. pic.twitter.com/0zKyhORNRI
— PMO India (@PMOIndia) March 6, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टेजवर आल्यावर त्यांच्या खास स्टाईलमध्ये डावा हात उंचावून लोकांना अभिवादन. त्यानंतर त्यांच्या शेजारीच बसलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या खांद्यावर हात ठेवला. यावेळी आठवलेंनी मोदींना बसण्याची विनंती केली. त्यानंतर मोदींनी आठवलेंशी गप्पा मारल्या. त्यांची विचारपूस केली. त्यावर आठवलेंनी त्यांना काही तरी सांगितलं. त्यावर मोदी दिलखुलास हसले. मोदी हसल्यावर आठवलेंनाही हसू आवरेनासे झाले. पुन्हा मोदींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. नंतर मोदींनी दुसरीकडे मान वळवली. इतक्यात राज्यपाल आले. तेव्हा मोदींनी त्यांना बसायला सांगितलं. त्यानंतर अचानक गर्दीतून मोदी… मोदी… मोदीचा जयघोष सुरू झाला. अचानक सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे मोदींनी पुन्हा एकदा हात जोडून पुणेकरांना अभिवादन केलं.
A boost to urban infra Pune. Watch. https://t.co/9X3mvgEpYm
— Narendra Modi (@narendramodi) March 6, 2022
मराठीतून सुरुवात
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यासह अशा अनेक प्रतिमांसह कलाकार समाजसेवकांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या पुण्यानगरीतील माझ्या बंधूभगिंना माझा नमस्कार, असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची मराठीत सुरुवात केली. त्यावेळी पुणेकरांनी टाळ्या वाजवून आणि मोदी मोदींचा गजर करत जोरदार स्वागत केलं. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्य लढ्यात पुण्याचं ऐतिहासिक योगदान राहिलं आहे. टिळक, आगरकर, चाफेकर बंधू, सेनापती बापट, गोपालकृष्ण देशमुख, भांडारकर आणि रानडेंसारखे अनेक स्वातंत्र्य सैनिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, असं ते म्हणाले.
Ensuring convenient and comfortable travel for the people of Pune.
PM @narendramodi inaugurated the Pune Metro and travelled on board with his young friends. pic.twitter.com/154a2mJk8f
— PMO India (@PMOIndia) March 6, 2022
आम्ही विनातिकीट प्रवास केला; आमच्याकडून वसूल करा : फडणवीस
या दौऱ्यादरम्यान मोदींनी पुणे मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण केलं आहे. यानंतर एमआयटी महाविद्यालयात मोदींची जाहीर सभा पार पडली. या जाहीर सभे दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोचा प्रवास विनातिकीट केल्याचं म्हटलं आहे.
On landing in Pune, PM @narendramodi unveiled a statue of Chhatrapati Shivaji Maharaj. pic.twitter.com/0zKyhORNRI
— PMO India (@PMOIndia) March 6, 2022
पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन झालं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी स्वतः मेट्रोचं तिकीट काढत प्रवास केला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या मेट्रोचं पाहिलं तिकीट स्वतः पंतप्रधानांनी मोबाईलद्वारे पेमेंट करून काढलं आणि प्रवास केला. पंतप्रधानांनी स्वतः तिकीट काढून प्रवास केला असताना आम्ही विनातिकीट प्रवास केला. आमच्याकडून पैसे वसूल करा.
आज पुण्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कारण आज पुण्याची आपली मेट्रो धावली आहे. आम्ही विनातिकीट प्रवास केल्यानं संकोच वाटत आहे. मेट्रो प्रशासनाने नंतर आमच्याकडूनही पैसे वसूल करून घ्यावं,असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे फडणवीस म्हणाले की, महामेट्रोनं पुणे मेट्रोत सर्वात महत्वाची गोष्ट ही केली की, ही देशातील पहिली अशी मेट्रो आहे, ज्याचे नॉन फेअरबॉक्स महसूल हे जवळपास ५० टक्के असेल. मेट्रो हे नवीन मॉडेल आज पुणे मेट्रोने देशासमोर ठेवलं आहे. तसंच फडणवीस यांनी मेट्रोचं काम पूर्ण होत असताना अनेक अडचणी होत्या. मात्र महामेट्रोनं विक्रमी वेळात हे काम पूर्ण केल्याचं म्हणत त्यांचं फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे.