हा संबंध मराठी माणसांचा, महाराष्ट्राचा पराभव !
- नितीन प्रधान, महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव
काॅग्रेसचा-शिवसेनेचा बेळगावात पराभव झाला असता तरी काही वाटायच कारण नव्हतं. पण महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव म्हणजे फक्त समितीचा पराभव नसतो. तो बापट, अत्रे-शंकरराव देव, नाना पाटील, अमर शेख, चिंतामणराव देशमुख, माडखोलकर, अण्णाभाउ साठे, आत्माराम पाटील, आंबेडकर-डांगे-प्रबोधनकार ठाकरेंसहीत संबंध मराठी माणसांचा-महाराष्ट्राचा पराभव असतो.
ज्या वेळी भाषावार प्रांतरचना सुरु झाली त्या वेळी मराठी बहुसंख्य असलेला कारवार; बेळगाव, निपाणी, खानापुर ह्या भागावरती महाराष्ट्र आग्रही असताना तो भाग कर्नाटकला दिला गेला. तेव्हापासून समिती त्या भागासाठी लढतीय. इंदिरा गांधी आणि गृहमंत्री बुटासिंग यांनी आठशे गाव महाराष्ट्रात आणण्याला संमती दिली; पण शेवटपर्यंत आली नाहीत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नेहमीच चर्चा टाळल्या. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात महाराष्ट्राची १०७ लोक बायकामुलासहीत चिरडली होती हे लक्षात ठेवा. बेळगावात घरात बसलेल्या लहान मुलांपासुन म्हाताऱ्यांपर्यंत गोळी मारुन मारले होते.
समिती कुठला राजकीय पक्ष नाही तर तो महाराष्ट्राचा लढा आहे. महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी समितीच्या मागे उभे राहायला हव. पण काही भिकार नेते कर्नाटकात जाउन कन्नडीगांचा प्रचार करतात. ह्यात काॅग्रेस असो की भाजप दोन्ही लोक आघाडीवर. समितीने भाजपच्या ईतर महानगरपालिंकेपेक्षा नक्कीच जास्त विकास केलाय. बेळगावात विकास फक्त महानगरपालिकेनेच केलाय. तरी एखाद्याला वोट द्यायचे नसेल तर त्याने देऊ नये. पण उगाच काही बालिश पाॅइंटवरती संजय राऊत यांना विरोध करायचा म्हणून ‘मराठी भैय्ये’ हे महाराष्ट्र एकीकरण समितीवर विनोद करताहेत.
कर्नाटकच्या भाजप सरकारने मागच्याच वर्षी शिवाजी महाराजांचा पुतळा उखडला तरीही तुम्ही भाजपाला सपोर्ट करता ? महानगरपालिकेवरचा भगवा काढून तिरंगा न लावता लाल पिवळा फडकला लावला तरी तुम्ही समाधानी आहात आणि गेली ६० वर्षे महाराष्ट्राचे कर्नाटकात प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाल्याने तुम्हाला मराठी असून आसुरी आनंद होत असेल, तर तुमच्या बापाला एकदा नक्की विचारा की तुम्ही जन्मायच्या २८० दिवस आधी तो कुठे गेला होता ?