राज्यपालांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम योग्यच : अमोल कोल्हे
पुणे : आजकाल राजकारणात मोठ्या महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तींकडून चुकीची वक्तव्य होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याकडे मी लक्ष वेधतो. महान लोकांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. कोणाबद्दल आकस, आसूया न ठेवता महापुरूषांविषयी अनावश्यक वक्तव्य करू नये, असा टोला नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला.
पुणे मेट्रोचे उद्घाटन आणि इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. यावेळी कोथरूडमध्ये जाहीर सभा झाली त्यावेळी बोलताना अजित पवारांनी भरसभेत राज्यपालांचे नाव न घेता टोला लगावला. अजित पवारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटदिवारे त्यांची स्तुती केली आहे.
रोखठोक अजितदादांकडून झणझणीत अंजन!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम आज अजितदादांनी केले. हे गरजेचे होते व ते फक्त @AjitPawarSpeaks दादाच करू शकतात! pic.twitter.com/ombOkcGRZi
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 6, 2022
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम आज अजितदादांनी केले. हे गरजेचे होते व ते फक्त अजित पवारच करु शकतात, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.