Top Newsआरोग्य

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीमध्ये थैमान; पोर्तुगाल, झेक रिपब्लिकमध्ये लॉकडाउन

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं फ्रान्स, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पोर्तुगाल, झेक रिपब्लिक ह्या देशांना कवेत घ्यायला सुरुवात केलीय. फ्रान्समध्ये एका दिवसात ३३ हजार ४६४ नवे रुग्ण सापडले. एप्रिलनंतर एवढे रुग्ण एकाच दिवसात सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दक्षिण आफ्रिकेत २ हजार ४६५ नवे रुग्ण आढळून आले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा आकडा ३२१ टक्क्यांनी अधिक आहे. जर्मनीत तर कोरोनानं हाहाकार माजवलाय. तिथं एका दिवसात ७५ हजार ५६५ नवे कोरोना रुग्ण सापडलेत. हा आतापर्यंतचा रूग्ण सापडण्याचा सर्वात मोठा आकडा आहे. अमेरिकेतही कोरोनाचा उद्रेक झालाय. १ लाख १७ हजार, ६६६ एवढे नवे रुग्ण सापडलेत. दीड हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. गेल्या १८ दिवसांपासून हा आकडा सातत्यानं वाढतो आहे. बेल्जियममध्ये कोरोनाचे २३ हजार ३५० नवे रुग्ण सापडलेत. ऑक्टोबरनंतरचा हा सर्वात मोठा रुग्ण आकडा आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण हे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं बाधित आहेत.

लस घेतल्यामुळे कोरोनापासून आपण सुरक्षित झालोत असं वाटत असेल तर यूरोप तसच आफ्रिकन देशात जो कोरोनाचा उद्रेक झालाय तो आपला समज खोटा ठरवणारा आहे. याच कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पोर्तुगाल, झेक रिपब्लिकसह काही देशांनी लॉकडाउन जाहीर केलाय तर काहींनी शाळा, ऑफिसेस पुन्हा एकदा बंद केलीत. आफ्रिकेतल्या सहा देशातून येणाऱ्या विमानांवरही बंदी घालण्यात आलीय. बी.१.१.५२९ असं कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं नाव असून तो अधिक घातक असल्याचे रिपोर्ट आहेत. विशेष म्हणजे हा नवा व्हेरिएंटनं त्या देशात धूमाकुळ घातलाय जिथं लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. म्हणजेच कोरोनाच्या व्हेरिएंटला रोखण्यात लस अपयशी ठरतेय.

कोरोनाच्या नव्यानं झालेल्या स्फोटावर इंग्लंड, इस्त्रायलनं ६ आफ्रिकन देशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. हे देश आहेत दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, नामिबिया, झिम्बाब्वे, लेसोथो, इस्वातिनी, मोझंबिक. नवा कोरोना व्हेरिएंट हा लसीकरणाच्या प्रोग्रामलाच धोका असल्याचं मत इंग्लंडनं व्यक्त केलंय. झेक रिपब्लिकनं आणीबाणीची घोषणा केलीय तर पोर्तुगालनं नैसर्गिक आपत्ती जाहीर केलीय. त्या पार्श्वभूमीवर नवी बंधनं घालण्यात आलीयत. त्यात मास्क पुन्हा अनिवार्य करण्यात आलाय. ख्रिसमसच्यापूर्वी टेस्टिंग सांगण्यात आलीय तर काही जागांसाठी पास अनिवार्य केला गेलाय. विशेष म्हणजे पोर्तुगाल हा जगातल्या सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशांपैकी एक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button