Top Newsराजकारण

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही गोंधळ

आंदोलनात शेतकऱ्यांच्या मृत्यूची नोंद नाही, नुकसान भरपाईचा प्रश्नच नाही; कृषी मंत्र्यांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. दोन्ही सभागृहात तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवातही जोरदार गदारोळात झाली. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच लोकसभेचे कामकाजही दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेच्या १२ खासदारांच्या निलंबनावरुन विरोधी पक्षांमध्ये नाराजी आहे. हे निलंबन रद्द करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. निलंबित खासदारांनी माफी मागावी, असं सभापतींनी बोलले असले तरी विरोधक त्यासाठी तयार नाहीत.

दरम्यान, कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या आंदोलनात शेतकऱ्यांचा मृत्यू आणि नुकसान भरपाईबाबत सरकारने मंगळवारी संसदेत प्रतिक्रिया दिली. सरकारकडे असा काही डेटा आहे का, ज्यामध्ये पीडित कुटुंबांचा उल्लेख असेल किंवा त्यांना मदत करण्याचा काही प्रस्ताव आहे का? असा प्रश्न विरोधकांनी सरकारला विचारला होता. यावर कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले की, कृषी मंत्रालयाकडे मृत्यूची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही.

आजचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी खासदारांच्या निलंबनाला विरोध केला. संसदेतील महात्मा गांधी पुतळ्यासमोर विरोधकांनी निदर्शने केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आम्ही राज्यसभेतील १२ विरोधी सदस्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी करत आहोत. आम्ही बैठक घेऊन पुढील कृती ठरवू.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार सौगता रॉय म्हणाल्या, १२निलंबित खासदारांना माफी मागण्यास सांगितले आहे, पण विरोधक माफी मागतील असे मला वाटत नाही. १२ खासदारांपैकी २ खासदार तृणमूलचे आहेत, तृणमूल माफी मागण्याच्या विरोधात आहे. तृणमूलचे दोन्ही खासदार गांधी पुतळ्यासमोर धरणे धरत बसले असून हे धरणे सुरूच राहणार आहे.

जया बच्चन यांनी चॉकलेट आणि पापड वाटले

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात गोंधळ सुरूच आहे. आजही विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्याचवेळी, विरोधी पक्षाच्या खासदारांच्या निलंबनाबाबत संसदेच्या आवारात विरोधकांचे जोरदार निदर्शने सुरू आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संसदेच्या संकुलातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करणार आहोत. इतर अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी खसदार जया बच्चन यांनी खासदारांना चॉकलेट टॉफी आणि आंब्याचे पापड दिले, यामुळे त्यांना आंदोलन करताना बळ मिळेल, असे त्या म्हणाल्या. अशाप्रकारे बच्चन यांनी आंदोलनाला त्यांचा पाठिंबा दर्शविला.

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काल निदर्शनास आणून दिले होते की, नियम २५६ नुसार खासदारांचे निलंबन त्याच संसदेच्या अधिवेशनात केले जाऊ शकते. संसदेच्या पुढील अधिवेशनात होणारी ही कारवाई पूर्णपणे नियमबाह्य आहे.

महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसणे हास्यास्पद

दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसणे हास्यास्पद आहे. मी विरोधी खासदारांना विनंती करतो की किमान पश्चात्ताप तरी करावा. आज आम्ही लोकसभा चालवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. विरोधकांची भूमिका काय आहे ते पाहू. आम्हाला लोकसभा चालवायची आहे, ते म्हणाले.

मात्र १२ खासदारांच्या निलंबनाव्यतिरिक्त, विरोधी पक्ष संसदेत कोणतीही चर्चा न करता तीन शेत विधेयके परत घेण्यात आल्याचाही निषेध करत आहेत. विधेयक मंजूर करण्यापूर्वी एमएसपी, ७०० आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू इत्यादी अनेक विषयांचा विचार केला गेला नाही आणि त्यावर चर्चा झाली नाही, असे विरोधकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button