Top Newsराजकारण

पंतप्रधानांना शेतकऱ्यांनी रोखल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी फोन उचलला नाही; नड्डांचा आरोप

नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नड्डा यांनी ट्विट करुन दावा केला आहे की, जेव्हा पंतप्रधान मोदींचा ताफा अडकला होता तेव्हा मुख्यमंत्री चन्नी यांनी फोनवर बोलण्यास नकार दिला होता.

नड्डांनी एकापाठोपाठ एक अनेक ट्विट केले. त्यांनी लिहिले, पंजाबमधील आगामी निवडणुकीत मतदारांच्या हातून दारुण पराभवाच्या भीतीने काँग्रेस सरकारने पंतप्रधानांचा कार्यक्रम रद्द करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. हे करत असताना पंतप्रधान मोदींना भगतसिंग आणि इतर हुतात्म्यांना आदरांजली वाहायची आणि विकासकामांची पायाभरणी करायची आहे हेही त्यांना आठवले नाही.

नड्डा पुढे म्हणाले की, पंजाबच्या काँग्रेस सरकारने त्यांच्या घृणास्पद कारवाया करून दाखवून दिले आहे की ते विकासविरोधी आहेत आणि त्यांना स्वातंत्र्य सैनिकांबद्दलही आदर नाही. सर्वात चिंतेची बाब म्हणजे ही घटना पीएम मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक होती. एसपीजीला पंजाबचे प्रधान सचिव आणि डीजीपी यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींचा मार्ग मोकळा आहे. तरीही आंदोलकांना तेथे जाण्याची परवानगी देण्यात आली. सर्वात वाईट म्हणजे मुख्यमंत्री चन्नी यांनी फोनवर बोलून प्रकरण सोडवण्यास नकार दिला. पंजाबच्या काँग्रेस सरकारने वापरलेली ही रणनीती लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला खटकेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button