तातडीच्या वाहतुकीसाठी ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ धावणार, ग्रीन कॉरिडोर तयार करणार
नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये करोनाचा तुटवडा जाणवत आहे. पंतप्रधान मोदींनी ही बैठका घेत राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. एवढचं नाही तर रुग्णांसाठी ऑक्सिजन आयातही केला जाणार आहे. अशातच आता देशात पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस धावणार आहे. उद्या म्हणजेच १९ एप्रिलला कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने ही ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना होणार आहे. दहा टँकर महाराष्ट्रातून जाणार आहेत.
लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडर नेण्यासाठी रेल्वेची पूर्ण तयारी झाली आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केला जाणार आहे. कळंबोली रेल्वे स्टेशनहून दहा रिकामे टँकर्स वायझॅक, जमशेदपूर, रौरकेला, बोकारो येथे रवाना होणार आहेत. तेथून ऑक्सिजन भरुन पुन्हा ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) टँकर रेल्वेने हलवू शकतात का याचा शोध घेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे संपर्क साधला होता. रेल्वेने तातडीने एलएमओ वाहतुकीची तांत्रिक शक्यता शोधून काढली. फ्लॅट वॅगन्सवर ठेवलेल्या रोड टँकरसह रोरो सेवेद्वारे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करावी लागेल, असं रेल्वेने सुचवलं. 17 एप्रिल रोजी रेल्वे बोर्डाचे अधिकारी, राज्य परिवहन आयुक्त आणि उद्योग प्रतिनिधी यांच्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतुकीशी संबंधित मुद्द्यांवर बैठक पार पडली. टँकर हे परिवहन आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडून दिले जातील, असा निर्णय झाला. रिकामे टँकर कळंबोली / बोईसर रेल्वे स्थानकांमधून ऑक्सिजन लोड करण्यासाठी वायझॅक आणि जमशेदपूर / रौरकेला / बोकारो येथे पाठविले जातील.
रेल्वे मार्गावर काही ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज आणि ओव्हर हेड इक्विपमेंट्सच्या उंचीच्या मर्यादेमुळे अडचणी येण्याची शक्यता होती. त्यामुळे रस्ते टँकरच्या विविध वैशिष्ट्यांपैकी, रोड टँकर टी 1618 चे मॉडेल लावले जाणे शक्य असल्याचे आढळले. हे टँकरर 1290 मिमी उंचीसह सपाट वॅगनवर ठेवले जाणार आहेत. वाहतुकीच्या सर्व चाचण्या रेल्वेकडून घेण्यात आल्या आहेत.
रेल्वेने तातडीने यावर कारवाई केली. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन रोल ऑन रोल ऑफ सर्विसद्वारे नेता येऊ शकतो का? याची चाचपणी सुरू झाली. यासाठी टँकर्स हे रेल्वेच्या वॅगन्सवर उभे करावे लागतील. रेल्वेवरील पुलांमुळे आणि ओव्हरहेड वायर्समुळे किंवा इतर बाबींमुळे अनेक ठिकाणी उंची कमी आहे. यामुळे ३३२० मिमी उंची असलेले टँकर्स मॉडल T 1618 यासाठी उपयोगी ठरले. यानंतर अनेक रेल्वे स्थानकांवर यांची चाचणी घेतली गेली. १५ एप्रिलला मुंबईतील कळंबोली गुड्स शेडमध्ये डीबीकेएम वॅगन आणण्यात आल्या. यासोबत लिक्विड ऑक्सिजनने भरलेला एक टी 1618 टँकरही आणला गेला. उद्योग आणि रेल्वेच्या प्रतिनिधींनी उंचीचा आढावा घेतला.
कमर्शियल बुकिंग आणि फ्रेट पेमेंटसाठी रेल्वे मंत्रालयाने १६ एप्रिलला एक सर्क्युलर जारी केले आहे. १७ एप्रिलला रेल्वे बोर्डाचे अधिकारी आणि राज्य परिवहन आयुक्त आणि उद्योगांच्या प्रतिनिधींची एक बैठक झाली. यात टँकर्सची व्यवस्था महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त करतील, असा निर्णय या बैठकीत झाला. आज रविवारी मुंबईत पश्चिम रेल्वेवर बोईसर इथे ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्यासाठी चाचणी घेण्यात आली. रेल्वे एका वॅगनवर लिक्विड ऑक्सिजनने भरलेला टँकर ठेवण्यात आला. त्यानंतर त्याचे माप घेण्यात आले. रेल्वेने याआधी कळंबोली आणि इतर ठिकाणीही अशा प्रकारची चाचणी घेतली. आता सोमवारी म्हणजे उद्या १० रिकामे टँकर्स रवाना करण्याची योजना आखण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या परिवहन सचिवांनी १९ तारखेपर्यंत टँकर्स पुरवण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.