मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मुलीचं लग्न ७ डिसेंबरला अगदी साधेपणानं लावलं. आपल्या घरी रजिस्टर विवाह करुन देत त्यांनी मुलीला सासरी पाठवलं. त्यावेळी जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. कोरोना संकटाच्या काळात कुठलाही झगमगाट न करता आव्हाड यांनी आपल्या लेकीचं लग्न अगदी साधेपणानं लावत एक आदर्श घालून दिल्याचं बोललं जात आहे. मात्र, दुसरीकडे आव्हाड यांच्या मुलीचंच गोव्यात अगदी धुमधडाक्यात लग्न साजरं झाल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावर आता आव्हाडांनी ट्विटरवरुन खुलासा केला आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1472600881698852871
नताशा आणि अॅलनचा विवाह गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने पार पडला. गोव्यातील ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये काही नेते मंडळी आणि बड्या लोकांची यावेळी उपस्थिती राहिली. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला शिवसेनचे नेतेही नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. या विवाहाच्या पूर्वसंध्येला संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे आव्हाड यांचा साधेपणाचा केवळ दिखावा होता का? अशी चर्चा रंगू लागली आहे. त्याला उत्तर देत आव्हाडांनी हे ट्वीट केलं आहे. ‘काही विकृतांच्या माहितीसाठी अॅलन हा ख्रिश्चन आहे म्हणून त्याला ख्रिश्चन पद्धतीने लग्न करावं लागलं. त्याच्या कुटुंबियांनी या लग्नासाठी गोवा हे ठिकाण निवडलं. अॅलन आणि नताशा हे दोन भिन्न व्यक्तिमत्व आहेत आणि ते एकमेकांच्या आवडी-निवडीचा आदर करतात’, असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1472606505497075714
नताशा ही जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी आहे. अॅलन पटेल यांच्याशी तिचा ७ डिसेंबर रोजी विवाह पार पडला. अॅलन आणि नताशा इयत्ता पहिलीपासून एकत्र शिकले आहेत. शाळेतला जोडीदारच तिचा लाईफ पार्टनर झाला आहे. नताशाचं शिक्षण एमएस इन मँनेजमेंटमध्ये झालं आहे. तर अॅलनचं शिक्षण एमएस अँड फायनान्स मँनेजमेंटमध्ये झाले आहे. अॅलन स्पेनमधल्या एला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला आहे. मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी हे लग्न साधेपणानं केलं होतं.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1472631185063002113