Top Newsराजकारण

अमेरिकन सैनिकांची अफगाणिस्तानातून घरवापसी; काबूलमधून शेवटच्या विमानाचे उड्डाण

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने अमेरिकेला ३१ ऑगस्टची डेडलाईन दिली होती. या दिवसानंतर अमेरिकेने काबूल विमानतळ सोडण्याचे फर्मान तालिबानने सोडले होते. यावर अमेरिकेने एक दिवस आधीच काबूल विमानतळ सोडला आहे. अमेरिकेचे शेवटचे विमान सी-१७ ने ३० ऑगस्टला दुपारी ३.२९ वाजता काबूलच्या हमिद करझई विमानतळावरून अमेरिकेकडे उड्डाण केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या कमांडरांच्या खतरनाक मोहिमेवरून परतण्यावर आभार मानले. यामुळे आजपासून अमेरिकेने अफगाणिस्तानातील राजनैतिक उपस्थितीही संपविली आहे.

काबूलहून शेवटचे अमेरिकी विमान निघाल्यानंतर बायडेन यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये आमचे सैन्य २० वर्षे होते. ही उपस्थिती संपली आहे. मी आपल्या कमांडरांना धन्यवाद देई इच्छितो. कोणत्याही सामान्य किंवा अमेरिकी नागरिकांचा मृत्यू न होऊ देता खतरनाक मोहिम संपविली. ही डेडलाईन ३१ ऑगस्टच्या सकाळीच ठरविण्यात आली होती.

बायडेन म्हणाले की, गेल्या १७ दिवसांत आमच्या सैन्याने आजवरच्या अमेरिकी इतिहासातील सर्वात मोठे एअरलिफ्ट केले. आम्ही १.२ लाखांहून अधिक अमेरिकी नागरिक, सहकारी देशांचे नागरिक आणि अफगाण नागरिकांना बाहेर काढले. मी उद्या दुपारी (मंगळवारी) अमेरिकी जनतेला संबोधित करणार आहे. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला यावर बोलणार आहे. योजनेनुसार तेथून बाहेर पडण्यासाठी एअरलिफ्ट मिशननंतर तेथे उपस्थित असलेल्या आमच्या सर्व कमांडर आणि जॉईंट्स चिफनी सर्वसहमतीने हा निर्णय घेण्यात आला होता.

अफगाणिस्तानमध्ये असलेला दूतावास अमेरिकेने कतारमध्ये हलविला आहे. जो कोणी अफगाणिस्तान सोडू इच्छित आहे, त्याची मदत अमेरिका करेल, असे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button