राजकारण

परमबीर सिंग यांचे भाजपपुरस्कृत आरोप : सचिन सावंत

गुजरातमध्ये पोलीस आयुक्तांनी अमित शहांवर आरोप केले होते तेव्हा राजीनामा का नाही घेतला?

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झालं असून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. अमित शहा 2002 साली गुजरातचे गृहराज्यमंत्री होते तेव्हा त्यावेळचे पोलीस प्रमुख डी.जी. वंजारा यांनी शहांवर गंभीर आरोप केले होते. पण त्यावेळी भाजपने शहा यांचा राजीनामा घेतला होता का, असा सवाल सावंत यांनी केला आहे. तसेच सिंग यांची कारकीर्द वादग्रस्त आहे. तसेच सचिन वाझे प्रकरणावर त्यांनी आधीच का नाही आवाज उठवला.असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांना तपास यंत्रणा माहिती पुरवत आहेत. सिंह यांनी पत्र दिल्यानंतर लगेचच फडणवीस मिडियासमोर कसे आले. हे सर्व स्क्रिप्टेड असल्याचेही सावंत यांनी यावेळी दावा केला.

शनिवारपासून परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बने देशभरात खळबळ उडवली आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारवरच नाही तर मुंबई पोलिसांवरही चहूबाजूने टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांवत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना व अमित शहा गृहमंत्री असताना गुजरात पोलीस प्रमुख डी जी वंजारा यांनी शहा पोलीस .यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. पण त्यावरून भाजपने शाह यांचा राजीनामा घेतला नव्हता. असे सांगत भाजपच्या दुटप्पीपणावरच बोट ठेवले. भाजपच्या नैतिकतेची दोन मापं असून एक स्वत:साठी आणि एक दुसऱ्यांसाठी असे सांगितले. तसेच मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवरही पोलीस अधिकारी असलेल्या संजीव भटने आरोप केले होते. तसेच दहशतवाद विरोधी पथक कसे एका तरुणीच्या मागे लागले होते . पण त्याची कधीच चौकशी झाली नाही असे सांगत सांवत यांनी भाजपला काही घटनांची आठवण करून दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button