कुलाबा-सीप्झ मेट्रोची मरोळ मरोशी येथे चाचणी होणार
मुंबई : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्वाची मेट्रो मार्गिका कुलाबा ते सीप्झ साठीच्या मेट्रो रेल्वेची डब्यांची मरोळ मरोशी येथे करण्यात येणार आहे. आरेतील राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या त्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी करण्यात येणार असून आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रोच्या चाचण्या पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
सध्या मरोळ मरोशी या रस्त्याच्या भुयारी मार्गाचे काम चालू असून या कामाच्या जवळच रॅम्प बनवून काम हाती घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चाचणीच्या कामाकरिता कोणतेही झाड तोडण्यात येणार नाही. मुंबई येथील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी कुलाबा ते सीप्झ या मार्गावर मेट्रो लाईन-३ चे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गिकेकरिता अल्स्टॉम या कंपनीने श्रीसिटी आंध्रप्रदेश येथे ८ डब्यांची ट्रेन तयार केलेली आहे. या गाडीची त्या ठिकाणी तांत्रिक चाचणी झालेली आहे. आता प्रत्यक्षात याची चाचणी मुंबई येथे १० हजार किमी चालवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर कुलाबा ते सीप्झ या मार्गिकेवर देखील ट्रेन चालविण्यात येणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर अशा पध्दतीच्या ३१ ट्रेन या मार्गावर धावण्याकरिता उपलब्ध होणार आहेत.