सर्व भारतीयांचा डीएनए एकच, हिंदू-मुस्लीम एकतेची कल्पना भ्रामक : मोहन भागवत

नवी दिल्ली : सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो, असे स्पष्ट मत मांडत सरसंघचालक मोहन भागवत यांनी लिंचिंगमध्ये सहभागी असणारे लोक हे हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचे विधान केले आहे. गाझियाबाद येथे मुस्लीम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संबोधित करताना मोहन भागवत यांनी हे मत मांडले.
सरसंघचालक या कार्यक्रमात म्हणाले की, हिंदू-मुस्लीम एकतेची कल्पना भ्रामक आहे. कारण ते वेगळे नाहीत तर एक आहेत. पूजा करण्याच्या पद्धतींवरून लोकांमध्ये भेदभाव करता येणार नाही. काही कामं अशी असतात जी राजकारणाच्या माध्यमातून होऊ शकत नाहीत. राजकारण लोकांना एकत्र आणू शकत नाही. राजकारण लोकांना एकजूट करण्याचे हत्यार बनू शकत नाही.
If a Hindu says that no Muslim should live here, then the person is not Hindu. Cow is a holy animal but the people who are lynching others are going against Hindutva. Law should take its own course against them without any partiality: RSS chief Mohan Bhagwat in Ghaziabad pic.twitter.com/ZcBS5X6mF5
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 4, 2021
या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितले की, आम्ही गेल्या ४० वर्षांपासून एकाच पूर्वजांचे वंशज आहोत, हे सिद्ध झाले आहे. भारतीय लोकांचा डीएनए हा एकसारखा आहे. तसेच हिंदू आणि मुसलमान हे दोन समूह नाही आहेत. त्यांना एकजूट करण्यासाठी काही करण्याची गरज नाही, कारण ते आधीपासूनच एकजूट आहेत. आम्ही एका लोकशाही देशात राहतो. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे वर्चस्व असू शकत नाही. केवळ भारतीयांचेच वर्चस्व असू शकते. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही आहे. एकतेचा आधार हा राष्ट्रवाद असला पाहिजे.
#WATCH | RSS chief Mohan Bhagwat recites a shayari at launch of a book 'The Meetings of Minds: A Bridging Initiative, written by Dr Khawaja Iftikhar Ahmed', in Ghaziabad pic.twitter.com/8awRq5rZaE
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 4, 2021
सरसंघचालक मोहन भागवत राजधानी दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबाद येथे आयोजित राष्ट्रीय मुस्लीम मंचाच्या कार्यक्रमामध्ये डॉ. ख्वाजा इफ्तिकार अहमद यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी गेले होते. डॉ. ख्वाजा अहमद यांनी वैचारिक समन्वय एक पहल नावाचे पुस्तक लिहिले आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या या कार्यक्रमात अनेक महत्त्वपूर्ण लोक सहभागी झाले होते.




