आरोग्यराजकारण

पत्रकारांच्या लसीकरणासाठी सिंधुदुर्ग पॅटर्न लागू करा; आ. नितेश राणेंचा ठाकरे सरकारला सल्ला

कुडाळ : ठाकरे सरकारने पत्रकारांच्या लसीकरणासाठी सिंधुदुर्ग पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावा असा सल्ला भाजपचे युवा आमदार नितेश राणे यांनी दिलाय. सिंधुदुर्ग जिल्हा हा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जिल्हा असल्याचंही नितेश राणेंनी अधोरेखित केलंय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारितेला संपूर्ण जगतात एक वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे आमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत आणि उपाध्यक्ष राजन म्हापसेकर यांच्यासह सर्व सदस्यांनी आपली प्रबळ इच्छाशक्ती दाखवत एक संपूर्ण राज्याला आदर्श दाखवून दिला. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पत्रकारांना कालपासून लसीकरण सिंधुदुर्गात सुरू झाले. त्यामुळे ठाकरे सरकारने पत्रकारांच्या लसीकरणाबाबत बोध घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पत्रकार लसीकरण पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा, अशी मागणी नितेश राणे यांनी सरकारकडे केली आहे.

आमदार नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी नियोजन करत येथील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले. हाच पॅटर्न राज्यातही राबवला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी राज्य सरकारची मानसिकता असायला हवी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा पॅटर्न राज्यात लागू करावा, असेही ते यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button