Top Newsराजकारण

शरद पवारांची भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात साक्ष

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना साक्ष देण्यासाठी समन्स पाठवले होते. २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी शरद पवार यांना साक्ष नोंदवण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण त्यापूर्वीच आज शरद पवारांनी राज्य सरकारने नेमलेल्या आयोगासमोर साक्ष नोंदवली आहेत. याप्रकरणात शरद पवारांची भूमिका नेमकी काय आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण शरद पवारांची साक्ष याप्रकरणात महत्त्वाची मानली जात आहेत.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. शरद पवारांनी यापूर्वी जुलै महिन्यात भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदवली होती. त्यानंतर आज पुन्हा शरद पवारांनी साक्ष नोंदवली आहेत. शरद पवारांच्यानंतर तत्कालीन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले आणि पुण्याचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र सेंगांवकर यांची देखील साक्ष नोंदवली जाणार आहेत.

शरद पवार यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भीमा कोरेगाव हिंसाचार भडकल्याचे वक्तव्य केले होते. मग याप्रकरणात अॅड. प्रदीप गावडे यांनी शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आयोगाने समन्स पाठवून शरद पवारांची साक्ष नोंदवली आहेत.

मराठा सेना आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या २०० व्या स्मृतिदिनानिमित्त ३१ डिसेंबर २०१७ रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान’ या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी बहुतांश दलित सैनिक होते. पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या ‘एल्गार परिषदे’तील वक्तव्यं कारणीभूत होते अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला.

या ‘एल्गार परिषदे’च्यामागे माओवादी संघटनांचा हात होता, असे म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत, या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली. २८ ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि वरनॉन गोन्सालविस यांना अटक केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button