तेजस्वी यादव यांच्याकडून २६ मार्चला ‘बिहार बंद’
पटना : बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी 26 मार्च रोजी बिहार बंदची हाक दिली आहे. बिहार विधानसभेतील घटनेने संतप्त झालेल्या तेजस्वी यादव यांनी सर्व विरोधी पक्षांसह बिहार बंदची घोषणा केली. ते म्हणाले की, बिहार विधानसभेत ज्या पद्धतीने विरोधी आमदारांना मारहाण केली गेली आहे, ते मी विसरणार नाही. म्हणूनच, 26 तारखेला आम्ही सर्वजण एकत्रितपणे रस्त्यावर हा मुद्दा उपस्थित करू. यासह, बेरोजगारी, शेतकर्यांसह अन्य विषयांवरही आवाज उठविला जाईल.
पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य करत म्हणाले की नितीशकुमार यांच्यापेक्षा खोटारडा माणसू कोणी नाही. मुख्यमंत्री मर्यादेवर बोलतात. मात्र, जेव्हा त्याचे मंत्री सभापतींकडे बोट दाखवून सभागृहात गैरवर्तन करीत होते. तेव्हा त्यांची मर्यादा कुठे होती?
ते म्हणाले की मुख्यमंत्री नितीशकुमारांना इतिहास माहीत असावा. सभापतींच्या दालनाला घेराव घालण्याची ही पहिली वेळ नव्हती. त्यांनी त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण करावी. लोकनायक कर्पूरी ठाकूर यांच्या काळात सभापतींच्या खुर्चीवर बसून हे सभागृह चालविण्यात आले होते. तेव्हा कोणीही पोलिसांना बोलावले नाही. पण, तुम्ही पोलिसांना बोलावले. जेडीयूच्या पोलिसांनी लोकशाहीच्या मंदिरात आमदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिला आमदारांचे कपडे फाटले.
तेजस्वी यादव म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मला धमकावले. प्रत्येक मुद्द्यावर ते संतप्त होतात. यावेळी मंत्र्यांनी चर्चेची पातळी सोडली. बंदुकीच्या बळावर विधेयक मंजूर करण्यात आले. बिहार पोलिस आता जेडीयू पोलिस झाली आहे. मात्र, आम्ही भाजपचे लोक नाही, जे लाठीला घाबरेल. अशा परिस्थितीत 26 तारखेला शेतकर्यांचा प्रश्न आहेच, सोबतचं आम्ही बेरोजगारी आणि ज्या आमदारांना मारहाण करण्यात आली, या गोष्टींचा निषेध करण्यासाठी बिहार बंद करू.